Nandurbar News : इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करा; आश्रमशाळेचे आवाहन | Apply for Admission in English Medium Residential School Call for Govt English Medium Ashram School nandurbar news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Govt English Medium Ashram School

Nandurbar News : इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करा; आश्रमशाळेचे आवाहन

Nandurbar News : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, नवापूर व शहादा या तीन तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार या निवासी शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वितरित करण्यात येत आहेत. (Apply for Admission in English Medium Residential School Call for Govt English Medium Ashram School nandurbar news)

प्रवेश अर्ज १७ एप्रिल २०२३ ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, खामगाव रोड, नंदुरबार या ठिकाणी सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत मिळतील. परिपूर्ण भरलेले प्रवेश अर्ज २४ एप्रिल २०२३ पर्यंत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, खामगाव रोड, नंदुरबार येथे स्वीकारण्यात येतील.

त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्राची अपूर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेने प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

असा करावा अर्ज

प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत, दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत, दिव्यांग असल्यास सक्षम दाखला जोडावा. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय सेवेत नसल्याबाबत हमीपत्र जोडावे. महिला पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला, विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म १ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या दरम्यान झालेला असावा.

अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवक, पालिका यांचा दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थी, वडील व आईच्या आधारकार्डची साक्षांकित प्रत जोडावी.