नाशकातील बँकेत दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा; एकाचा मृत्यू

armed robbery at muthoot finance in nashik 
armed robbery at muthoot finance in nashik 

नाशिक : सिटी सेंटर मॉल येथे मुथुट फायनान्सवर दिवसाढवळ्या दरोडा पडला. मुथुट फायनान्सच्या दोन कर्मचाऱ्यांवर दरोडेखोरांनी गोळीबार केला. ज्यात एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे. 

उंटवाडी परिसरातील मुथुट फाईनान्स कार्यालयात अज्ञात तिघांनी घुसून लाखो रुपयांचा ऐवज लूटला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला असता दरोडेखोरांनी गोळीबार केला. ज्यात बँकेत ऑडिटर असलेल्या संजू स्यमुअल याच्यावर तीन गोळ्या झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदुकीची गोळी स्पर्शून गेली तर व्यवस्थापकाच्या डोक्याला हाणामारीत जखम झाली आहे. चंद्रशेखर देशपांडे आणि कैलास जैन जखमी अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com