सैन्यभरतीत गर्दीचा महापूर!

जळगाव - सैन्यभरतीसाठी विविध जिल्ह्यांतून आलेल्या उमेदवारांनी शहरातील गांधी उद्यानालगत थांबून आसरा घेतला.
जळगाव - सैन्यभरतीसाठी विविध जिल्ह्यांतून आलेल्या उमेदवारांनी शहरातील गांधी उद्यानालगत थांबून आसरा घेतला.

जळगाव - येथील जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून सैन्यभरतीची प्रक्रिया सुरू झाली. आज चार हजार ४६७ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. पैकी केवळ २१७ उमेदवार मैदानी, वैद्यकीय तपासणीत पात्र ठरविण्यात आले, तर तब्बल ४ हजार २४७ उमेदवार बाद ठरले. भरतीसाठी आलेल्या युवकांमुळे जिल्हा क्रीडा संकुलासह शहरातील उद्याने, बसस्थानकामध्ये युवकांची गर्दी दिसून येत आहे.

शहरात औरंगाबाद येथील सैन्यभरती कार्यालयातर्फे (एआरओ) जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून सैन्यभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील परभणी, नंदुरबार, धुळे, जालना, नांदेड, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली या जिल्ह्यांतील युवकांसाठी सैन्यभरती आहे. काल मध्यरात्रीपासून मैदानी चाचणी घेण्यात आली. यात पहिल्या दिवशी परभणी, नंदुरबार, शिरपूर (धुळे) या तालुक्‍यांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. 

यासाठी सैन्यभरती कार्यालयातर्फे एकूण ५ हजार ३७४ उमेदवारांना कॉल लेटर सोडण्यात आले होते. त्यापैकी ४ हजार ४६४ उमेदवार हजर होते. त्यांनी मैदानी चाचणी दिली. मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. उमेदवारांचे कागदपत्र तपासण्यासाठी १६ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या चाचणीत फक्त २१७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

मध्यरात्रीपासूनच भरतीप्रक्रिया
शिस्तबद्ध व नियोजन पद्धतीने भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून सैन्याचे अधिकारी व जवान शहरात तळ ठोकून आहे. भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणी परीक्षा काल मध्यरात्री बारापासून सुरू झाली. तत्पूर्वी, रात्री दहाला उमेदवारांना मैदानात प्रवेश देण्यात येऊन त्यांचे अर्ज तपासण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com