खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

गंगागिरी भक्त मंडळाने येवलामध्ये ऑगस्ट महिन्यात  सप्ताह घेतला. हा सप्ताह संपल्यावर कालांतराने आधार या युट्युब चॅनलवर भक्त मंडळाची बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध झाल्या. चॅनलचे पत्रकार विनायक कांगणे यास भेटून बदनामीकारक बातमी प्रसिद्ध न करण्याची विनंती भक्त मंडळाच्या वतीने केली. परंतु कांगणे यांनी तुमच्या भक्त मंडळाच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत,मी बातमी देणारच असे सांगितले.आणि पुन्हा बातमी प्रसिद्ध झाली. विनायक कांगणे यांच्याकडून एकाने मध्यस्थी करत त्यास पैसे देऊन टाका, यावेळी विनायक कांगणे यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली तिची तडजोड रक्कम सव्वा कोटी ठरली

म्हसरूळ : कल्याण येथील आधार युट्युब चॅनलच्या तोतया पत्रकारास औरंगाबाद वैजापूर येथील गंगागिरी भक्त मंडळाकडून सव्वा कोटी रुपयांची खंडणी स्विकारताना म्हसरूळ पोलिसांनी जेरबंद केली आहे. 

बातमीचे खोटे पुरावे असल्याची धमकी दिली

याबाबत अधिक माहिती अशी की,औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील सावखेड गंगा येथे गंगागिरी भक्त मंडळ आहे. हे भक्त मंडळ अहमदनगर,नाशिक,संगमनेर अश्या इतर जिल्हा व तालुक्यात जाऊन सप्ताहाचे आयोजन करतात. गंगागिरी भक्त मंडळाने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात ऑगस्ट महिन्यात (ता.५ ते १२) सप्ताह घेतला. हा सप्ताह संपल्यावर कालांतराने आधार या युट्युब चॅनलवर भक्त  मंडळाची बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध झाल्या. युट्युब चॅनलचे पत्रकार विनायक कांगणे यास भेटून सदर बदनामीकारक बातमी प्रसिद्ध न करण्याची विनंती भक्त मंडळाच्या वतीने केली. परंतु कांगणे यांनी तुमच्या भक्त मंडळाच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत,मी बातमी देणारच असे सांगितले. आणि पुन्हा बातमी प्रसिद्ध झाली.

तोतया पत्रकाराची दोन कोटी रुपयांची मागणी

विनायक कांगणे यांच्याकडून एकाने मध्यस्थी करत त्यास पैसे देऊन टाका, यावेळी विनायक कांगणे यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली तिची तडजोड रक्कम सव्वा कोटी ठरली, पैसे देण्यासाठी म्हसरूळ करी लिव्ह हॉटेल हे ठिकाण ठरले. त्यानंतर भक्त मंडळाच्या सदस्यांनी बैठक घेत म्हसरूळ पोलीस ठाणे गाठत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांना आपली कैफियत मांडली. ठरलेली तडजोड रक्कम सव्वा कोटी रुपये त्यात एक लाख रुपये खऱ्या नोटा व एक कोटी चोवीस लाख खोट्या नोटा जमा केल्या आणि ते घेऊन आधार युट्युब चॅनलचे विनायक कांगणे यांनी करी लिव्ह हॉटेल बोलविल्या ठिकाणी भक्त मंडळाचे शिष्टमंडळ पोहचले असता कांगणे याने प्लॉट न.१६, कला नगर, जेलरोड येथे येण्यास सांगितले.

पोलिसांनी रचला सापळा

या ठिकाणी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, पोलीस हवालदार सुरेश माळोदे, उत्तम पवार, पोलीस कॉन्स्टेबल दराडे यांनी सापळा रचून संशयीत विनायक कांगणे यास अटक केली. याप्रकरणी बाळासाहेब लक्ष्मण थेटे यांनी फिर्याद दिली असून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव भडिकर करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrest fraud journalist demanding ransom