प्रेयसीसह तिघींना जाळणाऱ्या प्रियकराला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नाशिक : पंचवटीतील दिंडोरीरोडवरील कालिकानगरमध्ये प्रेयसीसह तिची मुलगी व नातीला पेटवून देऊन पसार झालेल्या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने उत्तरप्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातून अटक केली. जल्लोद्दीन खान (55, रा. कनोरिय, अलिगढ, उत्तरप्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी त्यास गेल्या 7 तारखेला अटक केली होती, परंतु परतीच्या प्रवासात त्याने धावत्या रेल्वेतून उडी घेत पलायन केले होते. तिहेरी जळीतकांडाप्रकरणी त्यास न्यायालयात हजर केले असता 24 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

संगीता सुरेश देवरे (40, रा. कालिकानगर, मायको दवाखान्याजवळ, फुलेनगर, दिंडोरीरोड), प्रीती रामेश्‍वर शेंडगे (20, रा. कोणार्कनगर) व तिची 9 महिन्याची मुलगी सिद्धी शेंडगे हे झोपलेले असताना, संशयित जल्लोद्दीन खान याने गेल्या 6 तारखेला पहाटे पाच वाजेच्या सुमारास ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले होते. यात चिमुकल्या सिद्धीचा होरपळून जागीच मृत्यु झाला होता. तर उपचारादरम्यान मायलेकी संगीता व प्रितीचा मृत्यु झाला होता. घटनेनंतर पंचवटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक गिरमे व कर्मचारी सागर पांढरे हे संशयिताच्या मागावर विमानाने दिल्लीत व दिल्लीतून अलिगढला पोहोचून त्यांनी संशयित जल्लोद्दीन यास 7 तारखेला सायंकाळी अटक केली. त्यानंतर ते झेलम एक्‍सप्रेसने नाशिककडे परतत असताना, वाटेत रेल्वेचा गती संथ झाली असता, अंधाराचा फायदा घेत संशयिताने धावत्या रेल्वेतून उडी घेत पलायन केले होते. त्याच्यामागोमाग सहाय्यक निरीक्षक गिरमे व पांढरे यांनीही उडी घेतली परंतु संशयिताने अंधारात गायब झाला. त्याच्या शोधासाठी पुन्हा एक पथक रवाना झाले परंतु संशयित हाती लागला नाही. 

दरम्यान, संशयिताचा माग काढत असताना, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांना संशयिताची माहिती हाती लागली. त्यामुळे सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक पुन्हा अलिगढ जिल्ह्यात पोहोचले आणि संशयित जल्लोद्दीन यास अतिदूर्गंम भागातील बिनीपूरागाव येथून अटक केली. रविवारी (ता.19) पहाटे चार वाजेच्या सुमारास पोलिस संशयिताला घेऊन नाशिकमध्ये पोहोचले. मात्र संशयित पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचेपर्यंत पंचवटी पोलिसांचीही धाकधुक कायम होती. तर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड हे पोलिस ठाण्यामध्येच तळ ठोकून होते. संशयिताला आज दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यास 24 तारखेपर्यंत 5 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Web Title: arrested to a lover who burn his lover and two other