गुलाबी थंडीत बहरले 'कलांगण' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

नाशिक : झाडाच्या फाद्यांतून जमिनीवर पडलेली सूर्यकिरणे.. इतिहासाची साक्ष देणारी कलेक्‍टर कचेरीची वास्तू.. दिग्गज अन्‌ ज्येष्ठ चित्रकारांपासून ते हौशी चित्रकारांनी कॅनव्हासवर केलेली रंगांची उधळण.. अन्‌ पवार तबला अकादमीतील शिष्यगणांनी सादर केलेले तालबद्ध तबलावादन... असा अनोखा, अविस्मरणीय अनुभव आज कलेक्‍टर कचेरीच्या प्रांगणात आला. विविध कलांच्या सादरीकरणाने कलेक्‍टर कचेरीत 'सकाळ-कलांगण' बहरले होते. 

आजच्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, 'सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार, भि. रा. सावंत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रफुल्ल सावंत आणि राजेश सावंत, प्रा. दीपक वर्मा, ज्ञानेश बेलेकर, शिल्पकार संदीप लोंढे, वास्तुविशारद प्रविण सरागे, चित्रकार रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

कलेक्‍टर कचेरीच्या हेरीटेज वास्तुत चित्रकला करतांना 'जे.जे.'मध्येच आल्यासारखं वाटतंय, अशी बोलकी प्रतिक्रिया चित्रकारांनी व्यक्‍त केली. प्रांगणातील प्रत्येक दृश्‍य हे चित्रकारांना ऑब्जेक्‍ट होते. यावेळी अगदी बाल व हौशी चित्रकारांपासून दिग्गज चित्रकारांनी कॅनव्हासवर चित्रकृती साकारली. चित्रकलेला पवार तबला अकादमीतर्फे तबलावादनाच्या कलेची जोड देण्यात आली. तसेच यावेळी भक्‍तीगीत, कविता, नकला सादर करून दाखवत उपस्थितांचे मनसोक्‍त मनोरंजन केले. 
 
Web Title: art blossoms in Sakal Kalangan at nashik