कलाशिक्षकांना 'आदर्श कलागौरव' पुरस्कार प्रदान

रोशन खैरनार
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सटाणा : कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बागलाण तालुक्यातील विविध शाळांमधील नऊ कलाशिक्षकांना 'व्हिजन नाशिक विभागीय कलासंघा' तर्फे सन २०१८ चा 'आदर्श कलागौरव' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात जिल्ह्यातील दीडशे कलाशिक्षकांचा गौरव करण्यात आला. 

सटाणा : कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बागलाण तालुक्यातील विविध शाळांमधील नऊ कलाशिक्षकांना 'व्हिजन नाशिक विभागीय कलासंघा' तर्फे सन २०१८ चा 'आदर्श कलागौरव' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात जिल्ह्यातील दीडशे कलाशिक्षकांचा गौरव करण्यात आला. 

व्हिजन नाशिक विभागीय कलासंघातर्फे नाशिक येथील गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात आयोजित विशेष सोहळ्यात पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ कलाक्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या कलाशिक्षकांचा 'आदर्श कलागौरव' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. बागलाण तालुक्यातील कलाशिक्षक एन. जी. जाधव (लोकनेते पं.ध.पाटील मराठा इंग्लिश स्कूल, सटाणा), दीपक पाटील (दोधेश्वर पब्लिक स्कूल, सटाणा), दिगंबर अहिरे (जनता विद्यालय, मुंजवाड), सुनील लाड (व्ही. पी. एन. विद्यालय, सटाणा), कमलाकर शेवाळे (नूतन विद्यालय, अंबासन), किसन पवार (न्यू इंग्लिश स्कूल, नामपूर), विनोद शिरसाळे (माध्यमिक विद्यालय, देवळाने), प्रमोद कापडणीस (जनता विद्यालय, जायखेडा), रुपेश सोनवणे (जनता विद्यालय, जोरण) या कलाशिक्षकांनी गेल्या १५ ते २० वर्षात कलाक्षेत्रात विशेष योगदान दिले असून चित्रकला विषयाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला आहे. त्याचबरोबर शालेय फलकावर दररोज दिनविशेष व फलकलेखनातून हे सर्व कलाशिक्षक सामाजिक प्रबोधनाचे काम करीत असतात.    

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन व्हिजन नाशिक विभागीय कलासंघाने 'आदर्श कलागौरव' पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती. नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, नाशिक कलासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद साळुंके, प्राचार्य दिनकर जानमाळी, प्राचार्य बाळ नगरकर, गणेश फुलसुंदर, वेतन अधिकारी उदय देवरे, विश्वास प्रबोधिनीचे विश्वास ठाकूर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, महादेव गोपाळे आदी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

त्यांच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीचे अध्यक्ष अॅड.विजयबापू पाटील, प्रल्हाद पाटील, मुख्याध्यापक बी.एस. देवरे, अनिल जाधव, प्राचार्य श्रीनिवाससुलू, बागलाण तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय सोनवणे, दादा खरे, एस. टी. भामरे, आर. डी. खैरनार, विनायक बच्छाव, रामकृष्ण अहिरे, एस.पी. जाधव, ए. एस. पाटील, डी. बी. ह्याळीज, एस. पी. दळवी, आर. जे. थोरात, बी. टी. वाघ, ए. टी. अहिरे, जी. एन. सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे. 

Web Title: art teachers awarded by adarsh kalagaurav award