'आषाढी'निमित्त ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

नाशिक : पाथर्डी फाटा "तनिष्का‘ गटातर्फे आषाढी एकादशीचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शनि मंदिरात झालेल्या शिबिरात तनिष्का डॉक्‍टर्स फोरम तसेच सिप्ला कंपनीने मोफत सेवा उपलब्ध करून दिली.

या वेळी परिसरातील नागरिकांसाठी नेत्रतपासणी, हिमोग्लोबिन, रक्तगट आदींसह अन्यही तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. तनिष्का डॉक्‍टर्स फोरमच्या प्रमुख डॉ. आशालता देवळीकर, डॉ. उज्ज्वला निकम, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. वैशाली खरे, डॉ. मेधा कुमावत, कविता पाटील, जयश्री पवार आदींसह सिप्ला कंपनीच्या वैद्यकीय प्रतिनिधींनी सहभाग घेतला. शिबिरात शंभरावर नागरिकांनी सहभाग नोंदविला. पोलिस उपायुक्त साहेबराव चौधरी यांनी सांगितले, की "तनिष्का‘ व्यासपीठातर्फे राबविले जाणारे उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद असून, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी मिळण्यास मदत झाली आहे. डॉ. देवळीकर, अनिता जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. शिबिरासाठी पोलिस उपायुक्त साहेबराव चौधरी, अनिल गायकवाड, गटप्रमुख अनिता सोनवणे, अनिता जाधव आदींसह "तनिष्का‘ सदस्य उपस्थित होते. "तनिष्का‘चे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. "तनिष्का‘ गटप्रमुख ज्योती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. 

Web Title: 'Ashadhi' cause elderly health camp