मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परिक्षेत खुल्या वर्गातून आश्विनी निकम अकरावी

संजीव निकम
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नांदगाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षक पदाच्या खुल्या प्रवर्गातील महिलांच्या गटातून तालुक्यातील परधाडी येथील आश्विनी आबासाहेब निकम हिने अकरावा क्रमांक मिळविला आहे.

अश्विनीच्या निमित्ताने नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातल्या मुलींच्या गुणवत्तेवर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. सध्या स्पर्धा परीक्षांतून सहभाग घेणाऱ्या मुलींच्या संख्येत होणारी वाढ दिलासादायक असली तरी, परधाडी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने कुठल्याही प्रकारच्या क्लासेसला न जाता तिने मिळवलेले यश त्यामुळेच सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला आहे.

शासकीय आश्रमशाळेतून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक आबासाहेब निकम यांची मुलगी आश्विनी हिने सुरगाणा सारख्या आदिवासी तालुक्यातूम प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेतले व जळगावच्या गोदावरी फाउंडेशनच्या अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल मधून आपले शिक्षण पूर्ण केले करियरच्या वाट निवडतांना मुली मॅकेनिकल इंजिनियरिंगकडे कमी प्रमाणात वळतात. मात्र मुलींना खरी संधी या ठिकाणी असून योग्य अभ्यास व आंतरिक ध्येय गाठण्याची इच्छा असली यश गवसणी घालते अशी भावना अश्विनीने यानिमित्ताने बोलून दाखविली. आश्विनी निकमच्या या यशामुळे परधाडी न्यायडोंगरी भागातून आप्तस्वकीय, मित्रमैत्रिणी व ग्रामस्थांनी आपला आनंद साजरा केला. माजी आमदार अॅड अनिल आहेर, जिल्हा परिषद सदस्या आश्विनी आहेर, माजी उपसभापती उदय पवार शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पाटील आदींनी आश्विनी निकमचे अभिनंदन केले आहे

Web Title: Ashwini Nikam eleven from the open class in the examination of the Motor Vehicle Observer