वीस महिने उलटूनही विद्युत सहायक प्रतीक्षा यादीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

3 हजार 34 उमेदवार प्रतीक्षेत; प्रकाशगडसमोर 22 ला आंदोलन
नाशिक - महावितरणने मे 2014 मध्ये विद्युत सहायकांच्या 6 हजार 73 जागा भरण्यासाठी मेगा भरती केली. या मेगा भरतीनंतर लेखा सहायक व कनिष्ठ अभियंतापदाची भरतीप्रक्रिया पार पाडली. मात्र, विद्युत सहायकपदाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या 3 हजार 34 उमेदवारांना अजूनही "वेटिंग'वरच ठेवले आहे. 19 महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या या उमेदवारांनी आता सरळ महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयासमोर 22 डिसेंबर रोजी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे निवेदन महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे. प्रतीक्षा यादी संपर्कप्रमुख संतोष कराड यांनी हे निवेदन दिले. महावितरणने मे 2014 मध्ये 6 हजार 73 विद्युत सहायक पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करून त्यांची निवड यादी घोषित केली होती. त्याचवेळी 3 हजार 34 उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर केली. परंतु 6 हजार 73 उमेदवारांपैकी केवळ 40 ते 45 टक्‍केच उमेदवार पात्र ठरले, ते सर्व महावितरणमध्ये कार्यरत आहेत. म्हणजे संबंधित जाहिरातीनुसार 3 हजार 34 पेक्षा जास्त विद्युत सहायकांच्या जागा रिक्‍त आहेत. त्या रिक्‍त जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्‍ती मिळणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीने नियुक्‍त्या दिल्या नाहीत. डिसेंबर 2015 मध्ये व्यवस्थापकीय संचालकांना याबाबत कळविले होते. तेव्हा त्यांनी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्‍तीची मंजुरी दिली जाईल, असे 5 जानेवारी 2016 रोजी जाहीर केले होते. नोव्हेंबर 2016 मध्ये मार्च 2015 मधील लेखा सहायक व कनिष्ठ अभियंत्यांच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्‍त दिल्यात, मात्र विद्युत सहायक भरतीतील उमेदवारांना अद्याप नियुक्‍त्या दिल्या नाहीत.
दरम्यान, व्यवस्थापकीय संचालकांना 5 डिसेंबर रोजी निवेदन पाठविले असून, 22 डिसेंबर रोजी मुंबईत प्रकाशगड मुख्यालयासमोर प्रतिक्षा यादीतील सर्व उमेदवार आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यात देण्यात आला. तसेच, सर्वांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Assistant Electrical twenty months again waiting list

टॅग्स