सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजलीसह निजामपूरकरांनी जागविल्या स्व. अटलजींच्या आठवणी.!

भगवान जगदाळे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) - येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे आज सकाळी दहा वाजता माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सार्वजनिक शोकसभा घेण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड. शरदचंद्र शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. स्व. वाजपेयींच्या निजामपूर भेटीच्या स्मृती यावेळी जागविण्यात आल्या.

सर्वप्रथम ऍड. शरदचंद्र शाह, सरपंच साधना राणे, ग्रामविकास अधिकारी पी. बी. मोराणे, हर्षद गांधी, अय्युब खाटीक आदींनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. तर इतर ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी रांगेने स्व.वाजपेयींच्या प्रतिमेस पुष्प व माल्यार्पण केले. यावेळी ऍड. शरदचंद्र शाह, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, रघुवीर खारकर, ताहीरबेग मिर्झा, महेंद्र वाणी, जितेंद्र चिंचोले आदींनी मनोगते मांडली. शोकसभेस माजी जिल्हा परिषद सदस्य चंदूलाल जाधव, म्हसाई ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, माजी सरपंच अजितचंद्र शाह, प्रमोदचंद्र शाह, जगदीशचंद्र शाह, रमेश वाणी, ग्रामपंचायत सदस्य सलीम पठाण, परेश वाणी, जाकीर तांबोळी, दीपक देवरे, सुनील बागले, कमलबाई मोरे, राजेंद्र शाह, त्रिलोक दवे, भय्या गुरव, विजय राणे, युसुफ सय्यद, विशाल मोहने, डॉ. हरिभाऊ ठाकरे, डॉ. महेश ठाकरे, दिनेश मालपुरे, प्रवीण शाह, शैलेश शाह, जगदीश मराठे आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Atal Bihari Vajpayee Tribute