एटीएम सेवा बंदच...! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

अमळनेर - धरणगाव येथे सहा बॅंक असून 60 खेड्यांचा कारभार यावर चालतो. यातील काही बॅंकांकडून एटीएम सेवा पुरविण्यात येतात, तर काहींचे एटीएम दीर्घकाळापासून बंदच आहेत. यामुळे धरणगावकर त्रस्त झाले आहेत. ग्राहकांचे हाल थांबवावेत, राष्ट्रीयकृत बॅंकांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातून होत आहे. 

नोटाबंदीने जनता अगोदरच होरपळली आहे. मात्र, धरणगाव शहरात यापूर्वीपासूनच बॅंकांचा कारभार हवा तसा पारदर्शी नाही. याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. शहरात महाराष्ट्र, युनियन, एसबीआय, जिल्हा बॅंक, जनता बॅंक, अर्बन बॅंक आदी शाखा आहेत. त्यांच्या एटीएम सेवा नावालाच असून अनेक दिवसांपासून एटीएम केंद्र बंदच आहे. जिल्हा बॅंकेची शाखा असूनही काहीही कामाची नाही अशी ओरड शेतकऱ्यांसह सभासदांकडून होत आहे. या बॅंकेत नेहमी पैसेच शिल्लक नसतात. परिणामी ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राष्ट्रीयकृत बॅंका आहेत मात्र, त्या बॅंकांमध्येही मर्यादा आहेत. पैसे पूर्ण प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. एटीएम सेवा मिळत नसल्याने बॅंकांमध्ये रांगाच रांगा लागतात. स्टेट बॅंकेची शाखा सोडली तर कुठलीच बॅंक 24 हजार रुपयांच्या वर रक्कम देत नाही. त्यातही आता 50 हजारांपर्यंत मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. मात्र, पुरेशा रकमेअभावी तेवढी रक्कमही ग्राहकाला मिळत नाही. अधूनमधून एटीएम सुरू झाल्यास तोबा गर्दी होते. काही वेळा तर रागांमध्ये ग्राहकांची बाचाबाचीही होत असल्याचे दिसून येते. एटीएम केंद्र नियमित सुरू ठेवण्यासाठी बॅंक प्रशासनाने कायम लक्ष ठेवून व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM service shut