अमळनेर: पावरा कुटुंबावर प्राणघातक हल्ला; एकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

सुखलाल रिचा बिलाली (35) यांची हत्या करून स्वत: रेल्वे पट्ट्याखाली येऊन त्याने आत्महत्या केली. यात पावरा कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास निदर्शनास आली. 

अमळनेर : उत्राण (ता. एरंडोल) येथील एका शेतात वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर ज्ञानसिंग पितापालसिंग पावरा याने किरकोळ वादातून प्राणघातक हल्ला चढविला.

सुखलाल रिचा बिलाली (35) यांची हत्या करून स्वत: रेल्वे पट्ट्याखाली येऊन त्याने आत्महत्या केली. यात पावरा कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास निदर्शनास आली. 

भातखंडे (ता. भडगाव) येथील एका ज्ञानसिंग पितापालसिंग पावरा (वय 25) याने उत्राण येथील राजू भागवत पाटील यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढविला. कुटुंबप्रमुखाची हत्या करून त्याने स्वत: परदाडे (ता. पाचोरा) येथील रेल्वे पट्ट्याखाली येऊन आत्महत्या केली. या घटनेत एक सुखलाल यांची पत्नी कारूबाई बिलाली (वय 25), मुलगा गोविंदा बिलाली (पंधरा) व मुलगी सिमा बिलाली (वय 12) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. नेमका वाद कोणत्या कारणाने झाला ही माहिती अद्याप कळू शकली नाही.

Web Title: attack on family in Amalner