वटार येथे बिबट्याचा शेळ्यांवर भरदिवसा हल्ला

रोशन भामरे
गुरुवार, 28 जून 2018

बागलाण तालुक्यातील वटार येथिल सावतावाडी वस्तीतील जीभाऊ दगा बागुल यांच्या राहत्या घराजवळ काल बुधवार (ता.२७) रोजी दुपारी 4:30 वाजता बिबट्याने हल्ला चढवीत दोन शेळ्यांना आपले भक्ष्य केले. दरवर्षी या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुभती जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रकाराने ग्रामस्थ भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तळवाडे दिगर : बागलाण तालुक्यातील वटार येथिल सावतावाडी वस्तीतील जीभाऊ दगा बागुल यांच्या राहत्या घराजवळ काल बुधवार (ता.२७) रोजी दुपारी 4:30 वाजता बिबट्याने हल्ला चढवीत दोन शेळ्यांना आपले भक्ष्य केले. दरवर्षी या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुभती जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रकाराने ग्रामस्थ भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वीच येथील शेतकरी बाबा जयराम बागुल यांच्या पाच बकऱ्या एकाच रात्री खाल्या होत्या. त्या घटनेला आठ दिवस होत नाही तेवढ्यात हा दुसरा हल्ला झाला आहे.  एकाच महिन्यात तीन वेळा हल्ले करून आठ निष्पपाप मुक्या प्राण्यांचा बळी गेला. परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनही वनविभाग पिंजरा का लावत नाही असा प्रश्न येथील रहिवाशी करत आहेत.

गेल्या तीन ते चार महिन्यात 20  पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. असेच चालू राहीले तर बिबट्या लवकरच काहीतरी मानवी हानी करेल असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

घटनेची माहिती वनविभागाला कळविले असता तात्काळ बोरसे  यांनी घटनेची दखल घेत घटनास्थळावर येऊन रीतसर पंचनामा केला. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी, जीभाऊ खैरनार, उपसरपंच जितेंद्र शिंदे,  किरण खैरनार, मच्छिंद्र बागुल, जीभाऊ बागुल, हिरामण बागुल, हरी बागुल आदि शेतकरी उपस्थित होते.

Web Title: attack on leopard goats in Watar