मालेगाव : महावितरणच्या कर्मचाऱ्यावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

मालेगावातील मोसमपुल भागातील पुरातन अहिल्याबाई होळकर पुलावर महावितरणचे कर्मचारी असलेल्या रतिलाल पवार यांच्यावर तिघा भामट्यांनी हल्ला केला.

मालेगाव : शहरातील मोसमपुल भागातील पुरातन अहिल्याबाई होळकर पुलावर महावितरणचे कर्मचारी असलेल्या रतिलाल पवार यांच्यावर तिघा भामट्यांनी हल्ला केला.

संशयितांनी लुटीच्या इराद्याने केलेल्या हल्ल्यात गळ्यावर धारदार शस्त्राचा वार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. गुरूवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

चोरट्यांनी त्यांचा मोबाईल लुटून नेला. हल्लेखोर पसार झाले. पवार यांच्यावर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना वीसपेक्षा अधिक टाके पडल्याचे समजते. शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. रात्री शहरात नाकाबंदी लावून संशयितांचा शोध सुरू होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on mahavitaran empolyee in malegon