करणी केल्याच्या संशयावरून कोयत्याने हल्ला 

दीपक कच्छवा
शनिवार, 26 मे 2018

दडपिंप्री (ता.चाळीसगाव) येथील परशुराम नगर येथील राजेंद्र मंगु राठोड यांच्या मुलीस करणी करून आजारी पाडले या संशयावरून आरोपींनी नथु राठोड व साक्षीदारांच्या घरात घुसून मारहाण केली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मुलीवर करणी करून तीला आजारी पाडल्याच्या कारणावरून दडपिंप्री (ता. चाळीसगाव) येथे घरात घुसून कोयत्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दडपिंप्री (ता.चाळीसगाव) येथील परशुराम नगर येथील राजेंद्र मंगु राठोड यांच्या मुलीस करणी करून आजारी पाडले या संशयावरून आरोपींनी नथु राठोड व साक्षीदारांच्या घरात घुसून मारहाण केली. तसेच कोयत्याने हल्ला केला.त्यात नथु राठोडसह साक्षीदार जखमी झाले. या प्रकरणी नथु राठोड यांनी दिलेल्या तक्ररारीवरून राजेंद्र राठोड,रमेश राठोड,मुक्या उर्फ संदिप राठोड, भावडु राठोड, सुशिलाबाई राठोड, यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: attack on superstitions in Chalisgaon