नाशिक : मनसेच्या प्रकल्पांवरून राज ठाकरेंचे नाव हटविण्याचा प्रशासनाचा खटाटोप 

raj thakre.jpg
raj thakre.jpg

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांना अवकळा प्राप्त झाली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच राज ठाकरे यांचे नाव जाणूनबुजून हटविले जात आहे, असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना मनसेतर्फे निवेदन देण्यात आले. 

अवकळा प्राप्त झाल्यानंतर दुरुस्ती 

मनसेच्या सत्ताकाळात जे प्रकल्प झाले. त्यातील काहींकडे दुर्लक्ष केले जात आहे. जे प्रकल्प सुस्थितीत आहेत, तेथे असलेले राज ठाकरे यांच्या नावाचे फलक जाणीवपूर्वक झाकले जात असल्याने ते फलक दर्शनीय भागावर लावण्याची मुख्य मागणी करण्यात आली. स्मार्टसिटींतर्गत सायकल शेअरिंग उपक्रम राबविण्यात आला. परंतु सायकलकडे दुर्लक्ष होत असल्याने तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली. शहरात पथदीप बसवावेत, अस्वच्छता दूर करावी, डेंगीसह साथीच्या आजारांवर तातडीने नियंत्रण आणावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

स्वच्छतेच्या ठेक्‍यात मनसेची उडी 

महापालिकेतर्फे आउटसोर्सिंगद्वारे स्वच्छतेचा ठेका दिला जात आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेने या कामाला विरोध केला आहे. आता स्वच्छतेच्या आउटसोर्गिंगच्या ठेक्‍याला मनसेनेदेखील विरोध केला आहे. बेकायदेशीरपणे दिला जाणारा ठेका रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. 

या वेळी मनसे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, ऍड. रतनकुमार इचम, शहराध्यक्ष अंकुश पवार, पंचवटी विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना जाधव, जिल्हाध्यक्ष कामिनी दोंदे, शहर उपाध्यक्ष विजय अहिरे, शहर संघटक मिलिंद कांबळे, सागर कोठावदे, कैलास मोरे, अभिजित गोसावी, जिल्हा सचिव संदेश जगताप, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष नीलेश सहाणे, देवयानी वाघ, योगिनी सासे, रवींद्र देशमुख, आरती खिराडकर, अनिता ठोक, अक्षय खांडरे, भूषण भुतडा, निशांत जाधव, भूषण भुतडा, उदय देशमुख, प्रसाद जगताप, आकाश गरड उपस्थित होते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com