मान्सूनच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष 

रोशन भामरे
सोमवार, 18 जून 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : यावर्षी मान्सूपूर्व पावसाने मृगाच्या पूर्वसंध्येला चांगला पाऊस पडून सुखद धक्का दिला.वेळेला पाणी पडत असल्याचे पाहून बळीराजा सुखावला. मात्र हे सुखावलेपण क्षणिक ठरण्याची चिन्हे आहेत. प्रारंभ दणक्यात करणाऱ्या पावसाने खंडाचा मुक्काम वाढल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.तालुक्यात सध्या सोसाट्याचे वारे वाहू लागले आहेत.ऊन-सावल्यांचा खेळ चालू झाला असून आसमंतात पांढऱ्या ढगांच्या दाटीमध्ये पावसाच्या काळ्या ढगांचा मात्र लवलेश दिसत नाही.वाढते तापमान आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सध्या तरी पाऊस पडण्याची शाश्वती दिसत नाही.

रोजच्या नवीन हवामान अंदाजामुळे बळीराजा मात्र चागंलाच गोंधळला आहे.यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र कडून मिळाल्या नंतर सर्वाना अपेक्षा होती ती मात्र दमदार पावसाची परंतु नवीन अंदाजानुसार मान्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागामार्फत वर्तविली जात आहेत.

त्यामुळे रोजच्या  नवीन नवीन हवामान अंदाजामुळे शेतकरी मात्र गोधळात पडला आहे. अर्धा जून संपूर्ण सुद्धा पाऊस न पडल्यामुळे चालू वर्षीही भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागते कि काय अशी चर्चा ग्रामीण भागातून वर्तवली जात आहे.

अनेक ठिकाणी खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून,फक्त आणि फक्त आजच पाऊस येईल उद्याच पाऊस येणार अशा प्रतीक्षेत आहेत.परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्याचा एक मान्सूनपूर्व पाऊस सोडून अद्याप कोठेही मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही.मृग नक्षेत्र सुरु होऊन सात-आठ दिवस उलटल्यानंतर देखील पावसाचा एक थेंबही पडलेला नाही.या नक्षेत्रात शेतकरी मुग, उडीद, बाजरी, भूईमुंग, मका आदी. पिकांसह  कडधान्याह्या पेरण्या करतात परंतु पाऊस नसल्याने याचा परिणाम उत्पादनावर देखील होऊन उत्पादनात घट होणार आहे.

जून महिन्यातील मृण नक्षत्र हे खरीपातील पेरण्यासाठी पोषक वातवरण असलेले नक्षत्र मानले जाते. साधारणपणे जून महिन्यात पेरणीयोग्य जोरदार पाऊस झाला तर शेतकरी पेरणीस सुरुवात करतो. जून महिन्यात पिकाची पेरणी झाली, कि मग हि पिके वेळत येतात व पुढील रब्बी हंगामातील पिकाचे व्यवस्थित नियोजन करता येते. त्यामुळे जून महिन्यात पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल असतो. नक्षत्राच्या कालवधीनुसार पिकाची पेरणी केल्यास पिके रोगराईला बळी न पडता उत्पन्नही चागले मिळते.असे अनेक शेतकऱ्याचे मत आहे.त्यामुळे आजच्या काळात देखील एकून 11  नक्षत्रांना पिकांच्या दृष्टीने मोठे स्थान आहे.

Web Title: attention of farmers to the monsoon