गुंतवणूकीवर आकर्षक व्याजाचे आमिष..अन् वृध्दाला घातला नऊ लाखांना गंडा 

fake offer on investment.jpg
fake offer on investment.jpg

नाशिक : पंचवटीतील वयोवृद्धाला इंदूरच्या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास, आकर्षक व्याजासह परतावा मिळण्याचे आमिष दाखवले आणि तब्बल 9 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात सात संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असा घडला प्रकार....
सचिन चव्हाण उर्फ सचिन बजाज, कामिनी सोनी उर्फ शालिनी मेहरा, अंकित पाटीदार उर्फ युवराज, रवी त्रिपाटी, अंकुर जैन उर्फ शुभम, मनिषा झा, अमृता महाजन अशी संशयितांची नावे आहेत. चांदमल नथमल सुराणा (69, रा. हिराबाई कॉम्प्लेक्‍स, इंद्रकुंड, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या जून २०१८ मध्ये संशयितांनी इंदूरच्या विजयनगरमधील प्रिमीयम कॅपिटल रिसर्च कंपनीचे संचालक असल्याचे ओळख सुराणा यांना करून दिली होती. या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास तुम्हाला आकर्षक व्याजसह चांगल्या रकमेचा परतावा मिळेल असे आश्‍वासन दिले होते. संशयितांनी दिलेल्या आश्‍वासनावर वृद्ध सुराणा यांन विश्‍वास ठेवला आणि कंपनीमध्ये त्यांनी 8 लाख 91 हजार रुपयांची गुंतवणूक केली.

पण त्यानंतर श्री. सुराणा यांना संशयितांच्या कंपनीकडून गुंतविलेल्या रकमेवर कोणत्या प्रकाराचा परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संशयित संचालकांकडे विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पंचवटी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक एस.बी. चोपडे हे सदरील गुन्ह्याचा तपास करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com