लिलाव थांबल्याने शेतमालाची 15 कोटींची उलाढाल ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नाशिक - पाचशे-हजारांच्या नोटा बंद झाल्याने चार दिवसांपासून शटरडाउन झालेल्या बाजार समित्यांमधील लिलाव आजपासून पूर्ववत होतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती; पण नवीन नोटांचा तिढा कायम राहिल्याने व्यापाऱ्यांनी बेमुदत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाला कांदा-धान्यासह शेतीमालाची पंधरा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. 

उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, आसाम, दिल्ली, पंजाब, हरियाना अशा देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच दुबई, कोलंबोला दिवसामध्ये जाणारा सव्वा लाख क्विंटल कांदा थांबला आहे. 

राजस्थानमध्ये नवीन कांदा बाजारात येण्यास सुरवात झाली असली, तरीही त्याचा आकार छोटा असल्याने दिल्लीकरांची नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे. खरे म्हणजे, आजपासून व्यवहार सुरळीत होतील अशी अपेक्षा होती; पण व्यापाऱ्यांना व्यवहारापोटी द्यावयाच्या धनादेशाचे "बुक' बॅंकांकडून मिळाले नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता धनादेशांद्वारे अथवा शेतकऱ्यांच्या बॅंकेतील खात्यात लिलाव झालेल्या शेतमालाचे पैसे देण्याची परवानगी मिळावी, अशा आशयाची पत्रे बाजार समित्यांना दिली आहेत. त्यावर येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय अपेक्षित आहे. नाशिक बाजार समितीमधील 11 ते 13 नोव्हेंबरला लिलाव बंद होते. सोमवारपासून (ता. 14) लिलाव सुरू झाले आहेत. मात्र, मागणीअभावी कांद्यासह भाजीपाल्याचे भाव घसरले आहेत. 550 रुपये क्विंटल या सरासरी भावाने विकला गेलेला कांदा आज 403 रुपयांना द्यावा लागला. शंभर जुडीमागे कोथिंबीरच्या भावात 500, मेथीच्या भावात 300, शेपूच्या भावात 600 रुपयांची घसरण झाली आहे.

Web Title: Auction turnover of Rs 15 crore stop Agricultural