‘खानदेश क्वीन’साठी ४८ सौंदर्यवतींचे ‘ऑडिशन’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

२५ जणींची होणार निवड; महापालिका, अनन्या ग्रुपचा धुळ्यात उपक्रम

धुळे - येथील महापालिका व अनन्या ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (ता. १८) ‘खानदेश क्‍वीन’ स्पर्धा होत आहे. स्पर्धेसाठी राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात आज ‘ऑडिशन’ झाली. खानदेशातील ४८ महिलांनी स्पर्धेसाठी ‘ऑडिशन’ दिले. प्रवेश अर्ज भरून व ओळख परिचय केल्यानंतर २५ जणींची अंतिम स्पर्धेसाठी निवड केली जाईल. निवड झालेल्या महिलांना दूरध्वनीद्वारे तशी माहिती कळविली जाईल, अशी माहिती संयोजकांनी दिली. 

आज दुपारी चारपासून सुरू झालेल्या निवड चाचणीत कोरिओग्राफर मयूर गुळवे यांनी परीक्षण केले. व्यक्तिमत्त्व, आत्मविश्‍वास, रॅम्प वॉकवर चालताना घ्यावयाची काळजी, पाळावयाचे नियम याविषयी मार्गदर्शन केले. महापौर कल्पना महाले, आयुक्‍त संगीता धायगुडे यांनी सहभागी महिला व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी मार्गदर्शन केले. शीतल शहा, सुषमा अग्रवाल यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. 

अलका कुबल विशेष आकर्षण
खास महिलांसाठी असलेल्या कार्यक्रमात मराठी सिनेअभिनेत्री अलका कुबल यांची उपस्थिती विशेष आकर्षण असेल. त्यांच्या उपस्थितीत ‘खानदेश क्‍वीन’ची निवड होईईल. त्यासाठी महिलांनी आधीच तयारी करून उत्कृष्ट सादरीकरण कसे होईल यासाठी टिप्स शोधायला सुरवात केली आहे.

कार्यक्रमस्थळी काहींनी सांस्कृतिक कार्यक्रमांचाही सराव सुरू केला आहे. जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर महाले, आयुक्‍त धायगुडे व रेखा मुंदडा यांनी केले.

Web Title: audition for khandesh queen