देवमामलेदारांच्या नावाचा पुरस्कार हाच सर्वोच्च गौरव : वासुदेव देसले 

satana
satana

सटाणा : भारतीय संस्कृतीची मुल्ये शिक्षकांमुळेच जतन असून शिक्षकांचा आदर राखणे व त्यांचा मानसन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. निष्ठापुर्वक व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या शिक्षकांना देवमामलेदारांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी काल सोमवारी (ता. 10) येथे केले.

येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ सटाणा देवमामलेदार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'देवमामलेदार आदर्श शिक्षक गौरव' पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून देसले बोलत होते. अध्यक्षस्थानी देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड तर प्रमुख पाहुणे म्हणून बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले, रोटरीचे उपप्रांतपाल अभिजित बागड, गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, रोटरीच्या अध्यक्षा सीमा सोनवणे, सचिव उज्वला जाधव, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, प्राचार्य डॉ. दिनेश शिरोडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार हिले म्हणाले, पुस्तकाच्या माध्यमातून घडवले जाणारे विद्यार्थी भावी आयुष्यात जबाबदार नागरिकांची भूमिका पार पडत असतात. अशा जबाबदार समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे गरजेचे आहे. भालचंद्र बागड यांनी प्रास्ताविकात देवस्थानच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. 

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 'देवमामलेदार आदर्श शिक्षक गौरव' पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तर ग्रामीण युवा उद्योजक पुरस्कारप्राप्त प्रशांत कोठावदे यांचाही विशेष सत्कार झाला. कार्यक्रमास रमेश देवरे, पी. आर. जाधव, सोपान खैरनार, बा. जि. पगार प्राचार्या एस. बी. मराठे, मुख्याध्यापक ए. डी. सोनवणे, रवींद्र भदाणे, एस. बी. कोठावदे, बी. एस. देवरे, स्वप्नील बागड, रमाकांत भामरे, काशिनाथ डोईफोडे, किरण दशमुखे, कैलास अहिरे, प्रदीप पगार, आदिती अहिरे, रुपाली पगार, प्रियंका बागड, डॉ. विद्या सोनवणे, पुष्पा सूर्यवंशी, सरोज चंद्रात्रे, रोहित शिंदे, अंबादास अहिरे, पंडित महाजन, राजेंद्र निकम, नंदकिशोर शेवाळे, रमेश सोनवणे, भिका जाधव, डी. एल. अहिरे आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. ज्योती जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर उज्वला जाधव यांनी आभार मानले.

'देवमामलेदार आदर्श शिक्षक गौरव' पुरस्काराचे मानकरी :
अलकाबाई गायकवाड (प्राथमिक शिक्षिका, श्रीपूरवडे), संजय देसले (मुख्याध्यापक, नांदीन हायस्कूल), महेश देवरे (नगरसेवक व उपशिक्षक, नेमीनाथ जैन विद्यालय, चांदवड), शालिनी हुडे (उन्नती हायस्कूल, धुळे), किशोर क्षीरसागर (उन्नती हायस्कूल, तळेगाव, दिंडोरी), प्रशांत कोठावदे (ग्रामीण युवा उद्योजक).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com