पुरस्काराचे पैसे विद्यार्थ्यांच्या डिजिटल क्लासरूमसाठी

Awards money donate for students Digital Classroom in yevla
Awards money donate for students Digital Classroom in yevla

येवला : दिल्लीत मिळालेल्या पुरस्काराची रक्कम आपल्या शाळेला दान करत संस्कृत शिक्षकाने डाॅ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी डिजिटल क्लासरूम उभारण्यात हातभार लावला आहे. या क्लासरुमचे नुकताच उद्घाटन करण्यात आले. 

पुराण, वेद आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक व निरूपणकार डाॅ. कुळकर्णी यांच्या हस्ते येथील श्रीगुरूदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयात डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन झाले. ज्या शाळेने आपल्याला ओळख दिली, काम करण्याची संधी दिली अन् थेट दिल्लीत घेऊन जात पुरस्काराने सन्मानित केले. त्या शाळेविषयी अन् तेथील विद्यार्थ्यांविषयी त्यांनी आपल्याला मिळालेली 50 हजारांची पुरस्काराची रक्कम शाळेच्या डिजिटल क्लासरूम करिता दिली.

श्री. कुळकर्णी यांना गुरूपौर्णिमेला गेल्या वर्षात 27 जुलै नवी दिल्ली येथे भारत सरकारचा राष्ट्रीय संस्कृत पंडीत पुरस्कार प्राप्त झाला होता. या पुरस्काराची रक्कम पन्नास हजार त्यांनी विद्यालयाच्या डिजिटील क्लासरूमकरिता वापरण्याचे ठरवले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com