lakhan and ishwar pawara
lakhan and ishwar pawaraesakal

Inspirational News : बी.टेक. पदवीधर बनला मुंबई पोलिस! एमपीएससीची करतोय तयारी

Dhule News : दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवत त्याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती पूर्णत: विरोधात असताना बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाला. पाठोपाठ फूड टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी पदवी मिळविली. (B Tech youth graduate become Mumbai Police dhule news)

त्यानंतर त्याला एमपीएससीचे क्षेत्र खुणावू लागले. पण पोटापाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्यानेही तो डगमगला नाही. आपले शिक्षण, पदवी यांचा दुराभिमान न बाळगता तो पोलिसभरतीसाठी उभा राहिला आणि मुंबई पोलिस बनला.

शिरपूर तालुक्याच्या दुर्गम भागातील चांदसूर्या गावच्या लखन पावरा याच्या जिद्दीच्या कथेचे हे सार आहे. आई-वडील अशिक्षित, पावसाच्या मर्जीवर पिकणारी तुटपुंजी शेती अशा परिस्थितीत लखनचा जन्म झाला. वडील सत्तरसिंह पावरा अशिक्षित असले, तरी मुलांच्या शिक्षणाबाबत कळकळ बाळगून होते. मुले किमान लिहिण्या-वाचण्यापुरती शिकली पाहिजेत म्हणून त्यांनी लखनला वासर्डी (ता. शिरपूर) येथील आश्रमशाळेत टाकले.

पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने आश्रमशाळेतून घेतले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर येथील एसपीडीएम महाविद्यालयात विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. तेवढ्यावर न थांबता त्याने संभाजीनगर येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातून फूड टेक्नॉलॉजीमधून बी.टेक.चे शिक्षणही यशस्वीरीत्या घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

lakhan and ishwar pawara
Inspiration Wedding News : उच्च शिक्षित डॉक्टर जोडपे सत्यशोधक पद्धतीने विवाहबंधनात

त्यानंतर त्याने महाराष्ट्र कृषी सेवा विभागाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. एक प्रयत्नही केला. पण त्यात यश मिळाले नाही. मात्र जिद्द कायम होती. दरम्यान, स्वत:चा चरितार्थ आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येणाऱ्या खर्चासोबतच कौटुंबिक जबाबदारीही समोर उभी राहिली. पण लखन खचला नाही. त्याने नोकरी पत्करण्याचा निर्णय घेतला.

तो सरळ पोलिसभरतीची तयारी करून मैदानात उभा राहिला. मुंबई पोलिस दलातर्फे झालेल्या भरतीत मैदानी परीक्षेत ५० पैकी ३६, तर लेखी परीक्षेत १०० पैकी ७४ गुण मिळवून तो यशस्वी झाला. नुकतीच मुंबई पोलिस दलात त्याची नियुक्ती झाली. त्याच्या यशाने कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले, तर गावातून समाधान व्यक्त करण्यात आले.

पोलिस झाला तरीही स्पर्धा परीक्षेची तयारी त्याने सुरू ठेवली असून, ते ध्येय गाठल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा मानस व्यक्त केला. विशेष म्हणजे लखनने त्याच्या मोठ्या व लहान भावांनाही उच्च शिक्षणासाठी प्रेरणा दिली आहे.

lakhan and ishwar pawara
Inspirational News : पोलिस भरतीत अमळगावकरांचा दबदबा! 8 जणांनी मिळवले यश

ईश्वर पावराची भरारी

अतिदुर्गम भागातील गुऱ्हाळपाणी (ता. शिरपूर) येथील ईश्वर पावरा याचीही मुंबई पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली. त्याचे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण वाघाडी (ता. शिरपूर) येथील आर. सी. पटेल आश्रमशाळा, उच्च माध्यमिक शिक्षण आर. सी. पटेल महाविद्यालय, तर पदवीचे शिक्षण जळगाव येथे झाले. त्याने मैदानी चाचणीत ५० पैकी ३९, तर लेखी परीक्षेत १०० पैकी ७१ गुण मिळविले.

"आई-वडिलांची अखंड प्रेरणा माझ्यासोबत कायम होती. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले. स्वत:च्या गरजांकडे दुर्लक्ष करून त्यांनी मला शिकविले. माझ्या प्रत्येक कृतीला त्यांनी प्रोत्साहन दिले. मुंबई पोलिसांत भरती झालो पण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही." -लखन पावरा

lakhan and ishwar pawara
Dhule News : उपजिल्हा रुग्णालयातील अवैद्यकीय सेवा बंद, रुग्ण सलाइनवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com