बसमध्ये विसरलेली बॅग प्रवाशाला परत

बॅगेत जवळपास २५ हजाराचे साहित्य होते.
st bus
st busesakal

निमगूळ : दोंडाईचा आगारातील दोंडाईचा पाणसेमल ही बस दोंडाईचाहून पानसेमलकडे जात असताना निमगूळ बसस्थानकावरून चैतन्य हे मंदाणे या गावी जाण्यासाठी निघाले असता त्यांची बॅग बसमध्येच राहून गेली. त्यात बॅगसह टॅब हेडफोन व शैक्षणिक साहित्य बसमध्ये सोडून ते मंदाणे गावी उतरले.

बस चालक एन. टी. गिरासे व वाहक आर. डी. मगरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोंडाईचा बसस्थानकावर वाहतूक निरीक्षक निखिल पाटील यांच्याकडे जमा केली. निखिलचे मामा दत्तात्रय बागल यांनी दोंडाईचा बसस्थानकावर तपास केला असता त्यांना बॅग सुपूर्द करण्यात आली. बॅगेत जवळपास २५ हजाराचे साहित्य होते. मात्र वाहक व चालक यांच्या सतर्कतेने बॅग परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले. वाहक आर. डी. मगरे व चालक एन. टी. गिरासे यांचे आभार मानले.

st bus
अतिउच्च दाबाच्या विजेच्या टॉवरवर ‘हाय व्होल्टेज ड्रामा’
st bus
कृषी सन्मान योजनेचे पैसे मिळणार टपाल कार्यालयातून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com