बागलाणमध्ये प्रस्थापितांना धोबीपछाड देत नवोदितांची मुसंडी

satana
satana

सटाणा : बागलाण तालुक्यातील बहुचर्चित व महिलांसाठी आरक्षित असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निकाल आज सोमवार (ता. 28) रोजी अत्यंत धक्कादायक लागला. या निवडणुकीत प्रस्थापितांना धोबीपछाड देत नवोदितांनी मुसंडी मारल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच दाखल न झाल्याने त्या पुन्हा रिक्त राहिल्या तर भवाडे येथील थेट सरपंचपदासाठी मुदतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सरपंचपद रिक्त राहिले आहे. 

आज येथील तहसील कार्यालय समोरील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी 10 वाजता चोख पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीस थेट सरपंचपदाच्या मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. त्यात केळझर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी चंद्रभागा बहीरम यांना 776 मते मिळाली. त्यांनी कल्पना पवार यांचा 366 मतांनी पराभव केला. केरसाने ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी फुलाबाई माळी यांना 570 मते मिळाली. त्यांनी संगिता पवार यांचा 244 मतांनी पराभव केला.

मुळाणे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी अश्विनी विलास गरुड यांना 588 मते मिळाली. त्यांनी मनीषा अहिरे यांचा 171 मतांनी पराभव केला. 
तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीमधील वार्ड निहाय निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुढीलप्रमाणे : 

भाक्षी ग्रामपंचायत : वार्ड क्रमांक १ - भास्कर पाटील (४२३ मते), अश्विनी बागुल (३८२ मते)
वार्ड क्रमांक ३ - जिभाऊ पाटील (२४८ मते). 
केळझर ग्रामपंचायत : वार्ड क्रमांक ३ - वैशाली ठाकरे (३६३ मते), रंगनाथ गांगुर्डे (२३८ मते)
जायखेडा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : वार्ड क्रमांक ५ -विजेंद्र बच्छाव (३१३ मते).
 
निवडणुकीचे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष केला. तर थेट सरपंच व सदस्य पदी निवडून आलेल्या उनेद्वारांनी फेटे घालून मिरवणूक काढली. 

भाक्षी ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक १ मध्ये भास्कर पाटील या नेपाळी युवकाने विजय संपादन केल्याने तालुक्यात आज हा एकच चर्चेचा विषय ठरला. गेल्या ३० वर्षांपूर्वी भास्करचे वडील बलदेव पाटील हे नेपाळमधून सटाण्यात आले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या लोकनेते पं.ध.पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये बलदेव पाटील यांनी रात्रपाळीने गुरखा म्हणून नोकरी पत्करली. पाटील कुटुंबीय पूर्वीपासूनच भाक्षी या गावी भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. लहानपणापासून युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या भास्करने आपला जम बसविला. नुकत्याच झालेल्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत त्याने निर्णायक भूमिका बजावली. थेट सरपंचपदासह इतर वार्डातील निवडणूकही बिनविरोध झाली. मात्र वार्ड क्रमांक १ मध्ये निवडणूक लागली. या चुरशीच्या निवडणुकीत भास्कर मोठ्या मताधिक्क्याने निवडून आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com