नाशिकमध्ये उद्या 63 संघटनांतर्फे भव्य बहुजन क्रांती मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

नाशिक - बहुजन क्रांती मोर्चा मंगळवारी (ता. 3) नाशिकमध्ये काढण्यात येणार आहे.

नाशिक - बहुजन क्रांती मोर्चा मंगळवारी (ता. 3) नाशिकमध्ये काढण्यात येणार आहे.

तीन जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून या मोर्चास भालेकर विद्यालय मैदानावरून सकाळी अकराला सुरवात होईल. शहरातील विविध 63 संघटना यात सहभागी होणार आहेत. ऍट्रॉसिटी कायदा कडक करा, ओबीसींची जनगणना करा, भटक्‍या विमुक्‍तांना ऍट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या, ऍट्रॉसिटीचा दुरुपयोग करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करा, मुस्लिम समाजाला सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करून आरक्षण द्या, निवडणुकीत व्होटिंग मशिन बंद करा, "नीट' परीक्षा रद्द करा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मागे घ्या, मुलींच्या वसतिगृहात स्त्री अधीक्षिकांची नेमणूक करा, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.

Web Title: Bahun Kranti Morcha in Nashik