
Dhule Balaji Rathotsav : ‘बालाजी महाराज की जय, जगत पालका गोविंदा, लक्ष्मीरमणा गोविंदा, व्यंकट रमणा गोविंदा’च्या घोषात येथील बालाजी रथोत्सवाला शनिवारी (ता. २८) सकाळी एकला सुरवात झाली. ब्राह्मणवृंदाने वैदिक मंत्रोपचाराने संस्थानाचे मठाधिपती मेघश्याम बुवा यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
परंपरेनुसार राऊळ घराण्यातील हिंमतसिंह राऊळ यांच्या हस्ते बालाजी महाराजांची आरती झाली.(Balaji Rathotsav begins today in Sindkheda dhule news)
त्यानंतर व्यंकटेशाची मूर्ती रथावर आरूढ करण्यात आली व घंटानिनादाने बालाजी रथोत्सवात सुरवात झाली. बालाजी महाराज की जय, जय बालाजीचा घोष करत एकला रथ ओढून उत्सवास सुरवात करण्यात आली. बालाजीच्या रथाचा दोर ओढल्याने घरामध्ये सुख-समृद्धी नांदते, अशी भाविकांमध्ये श्रद्धा असल्याने रथ ओढण्यासाठी भाविकांची गर्दी होते.
रथमार्गावर ठिकठिकाणी भाविक आरती व केळी, नारळाचा नैवेद्य चढवत होते. रथावर सेवेत असलेले ब्रह्मवृंद सहकार्य करत होते. जय बालाजी, बालाजी महाराज की जय, गोविंदा गोविंदाच्या नामघोषात सारा परिसर दुमदुमत होता. शिंदखेडा शहर व परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन रथोत्सवात सहभाग घेतला. रथाला झेंडूच्या फुलांनी सजविलेले, चारी बाजूला केळीचे खांब लावलेले व आकर्षक रोषणाईने सजविले होते.
रथावर एकूण १२ ब्रह्मवृंद सोवळे लावून सेवेत दाखल होते. प्रत्येकाकडे वंशपरंपरागत जबाबदारी असते. ॲड. प्रथमेश दीक्षित, राहुल कुलकर्णी, सुहास जोशी, धनंजय गिरासे, ललित पाठक, अरुण गिरासे, राहुल जोशी, सोमनाथ पिले, हेमंत जोशी, संजय जोशी, संकेत कुलकर्णी, कृष्णकांत गिरासे आदी ब्रह्मवृंद विराजमान होते.
रथाच्या चाकाजवळ मोगरी सेवा
विठ्ठल माळी, कोमलसिंग गिरासे, अनिल लोहार, गिरीश लोहार, जीवन लोहार, अभिमान मिस्तरी, घनकरी म्हणून मोतीलाल बडगुजर, बारकू बडगुजर, अशोक बडगुजर, सेवेकरी म्हणून रमाकांत मिस्तरी, सुरेश माली, दिलीप गिरासे, भगवान राजपूत, दीपक देशमुख यांनी सेवा दिली. रथाची विद्युत रोषणाई देखभाल सुधीर शिंपी, मधुकर मराठे, भाऊसाहेब पाटील यांनी केली.
बंदोबस्त चोख
अरविंदलाल देसाई, हिमतसिंह राऊळ, देवीदास पाटील, चेतन शिंपी, श्रीराम चौधरी, उदय वानखेडे, जीवन भामरे पंच म्हणून काम पाहत होते. रथ मिरवणुकीत अनेक सामाजिक व राजकीय मान्यवरांनी रथ ओढून दर्शनाचा लाभ घेतला. रथ मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रथाच्या चाकाजवळ मोगरीवाले, घनवाले उपस्थित होते. पंचमंडळ व्यवस्थेत लक्ष देत होते. पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त चोख होता.
महावितरणचे सहकार्य
रथ मार्गावरील ठिकठिकाणी वीजखांबावरील असलेले वीजतार (वायर) काढणे व लावणे आदी काम करण्यासाठी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नीलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पी. एल. भामरे, जयेश पवार, राकेश पवार, जावेद पठाण, प्रदीप बडगुजर, प्रवीण गिरासे, लहू पाटील, संतोष आहिरे, अकबर शहा, पांडुरंग पाटील, मधू गिरासे, चेतन पाटील, गोपाल निकम, समाधान पाटोळे आदी कर्मचारी सहकार्य करीत होते
आज पालखी मिरवणूक
परंपरेनुसार रथ मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पालखी मिरवणूक काढण्यात येते. श्रींचे भाविकांना जवळून दर्शन व्हावे म्हणनू रविवार (ता. २९) सायंकाळी सातला बालाजी महाराजांच्या पालखीमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या वेळी परिसरातील हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. पालखीवरची विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी विशेष आकर्षण ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.