बाळगंगा पाझर तलावात ३८ वर्षानंतर आडणार पाणी

jalayukta-shivar.
jalayukta-shivar.

येवला - रहाडी येथील बाळगंगा पाझर तलावाला झळाळी मिळून या तलावात ९ दश लक्ष घन फुट पाणी अडवले जाणार आहे. तलावाचे प्रत्यक्ष धरणरेषेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नव्याने बांधण्यात येणार्‍या सांडव्याचे भुमिपूजन बुधवारी (ता. २८) झाले. या दुरुस्तीसाठी १९ लाख ८४ हजार रुपयांचा निधी जलयुक्त शिवार योजनेतुन जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांच्या पाठपुराव्याने उपलब्ध झाला आहे.

३८ वर्षापूर्वी या मुख्य धरणाची भिंत फुटली होती. तेव्हापासून यामध्ये पाणी आडत नव्हते. मात्र, सोनवणे यांच्या पाठवुराव्याने पाझर तलावाच्या कामासाठी जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी पाठपुरावा करुन १९ लाख ८४ हजार रुपयाचा निधी मंजुर करुन घेतला होता. त्यासाठी गावातील नागरिकांनी सन २०१६ मध्ये ४८ तासांचे उपोषण करुन हा प्रश्‍न ऐरणीवर आणला होता. लघुसिंचन जलसंधारण विभागा मार्फत धरणरेषेचे काम पूर्ण होऊन सांडव्याचेही काम वेगाने सुरु आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसिलदार नरेशकुमार बहिरम, लघु सिंचनच्या कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, शिवसेना नेते संभाजी पवार, संजय बनकर, बाळासाहेब लोखंडे, वसंत पवार, नवनाथ काळे, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, अरुण काळे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी दराडे यांनी नव्याने सांडवा बांधल्याने रहाडी हे गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण होणार असून, येत्या पावसाळ्यात आडवलेल्या पाण्यातुन गावाची पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर होणार आहे. तसेच या तलावातील ४० वर्षापासून साठलेला गाळ उपासण्यास जलयुक्तच्या माध्यमातुन प्राधान्य दिले जाईल. असे अश्वासन दिले. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी मनरेगा योजनेतुन प्राधान्याने विहिर मंजुर करण्याचा शब्द गटविकास आहिरे यांनी यावेळी दिला. विविध स्वयंसेवी संस्थामार्फत पाझर तलावातील ३८ वर्षापासून साठलेला गाळ उपासण्यात येणार असून परिसरातील शेतजमिनीसाठी सुपिक काळी माती उपलब्ध होणार आहे. तसेच तलावाची साठवण क्षमताही दुपटीने वाढणार आहे, असे सोनवणे म्हणाले.

उद्घाटन प्रसंगी सरपंच शांताबाई मोरे, शकुंतला सोनवणे, उपसरपंच सोनुपंत भोंगाळ, सदस्य जेमादार पठाण, सुलतान शेख, दादाभाऊ गायकवाड, अंजनाबाई सोनवणे, गीता महाजन, जुबेदाबी शेख, केशरबाई रोकडे, ग्रामसेवक बाळु आमुक, उत्तमराव रोकडे, हरिभाऊ महाजन,नितीन गायकवाड, सखाहरी गायकवाड, सुधाम रोकडे, बळवंत रोकडे, देविदास गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, जगन्नाथ पवार, नामदेव महाजन, रावसाहेब भोंगाळ, अजिम शेख, बाबुभाई शेख, अनिम शेख, बाबु दिलावर शेख, हुसेन शेख, कैलास जाधव, श्रीहरी गायकवाड, रामहरी गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, मच्छिंद्र थोरात, बाळु थोरात, जगनराव मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com