बळिराम शिंदे मृत्यूप्रकरणी चौकशी अहवालाची प्रतीक्षाच - डॉ. भूषणकुमार उपाध्याय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नाशिक - नाशिक रोड कारागृहातील कैदी डॉ. बळिराम शिंदे मृत्यूप्रकरणी स्थानिक पोलिस, तुरुंग प्रशासन, तसेच मानवाधिकार आयोगाकडून चौकशी सुरू आहे. तथापि, मार्च 2017 मधील या मृत्यू प्रकरणाचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे राज्याचे कारागृह विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी "सकाळ'ला सांगितले.

याप्रकरणी सगळे लक्ष कारागृहातील "सीसीटीव्ही' फुटेजकडे लागले असताना, साधारणपणे मध्यवर्ती कारागृहातील असे फुटेज फारतर महिनाभर सांभाळून ठेवले जाते. एखाद्या प्रकरणात मानवाधिकार आयोगाने त्यापूर्वीच मागणी केली असेल, तरच ते सादर केले जाते. डॉ. शिंदे मृत्यू प्रकरणात अशी मागणी करण्यात आलेली नाही, अशा शब्दांत ते फुटेज नष्ट करण्यात आल्याचे डॉ. उपाध्याय यांनी अप्रत्यक्षरीत्या कबूल केले.

अनधिकृत गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात परळी (जि. बीड) येथील डॉ. सुदाम मुंडे याच्या अनुषंगाने "सकाळ'मध्ये प्रकाशित होत असलेल्या बातम्यांबाबत बोलताना डॉ. उपाध्याय म्हणाले, की कारागृहातील अशा कोणत्याही मृत्यूची विविध तीन यंत्रणांमार्फत चौकशी होते. तशीच चौकशी डॉ. शिंदे मृत्यू प्रकरणातही सुरू आहे. 3 मार्च 2017 ला पहाटे झालेल्या या मृत्यूसंदर्भात मानवाधिकार आयोगाचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक रमेश कांबळे यांची त्या घटनेनंतर झालेल्या बदलीशी शिंदे यांच्या मृत्यूचा संबंध नसून, अन्य प्रशासकीय कारणांसाठी ती झाल्याचे डॉ. उपाध्याय म्हणाले.

Web Title: baliram shinde death case inquiry report bhushankumar upadhyay