बीएएमएस पदवीधारकांना संधी

Doctor
Doctor

नाशिक - प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा (गट- अ) दर्जाचे डॉक्‍टर उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. या रिक्त पदांवर एमबीबीएस पदवीधर नेमण्याचा सरकारने ठरविले, पण हे पदवीधर मिळत नसल्याने आता कंत्राटी पद्धतीने बीएएमएस पदवीधारकांची नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांवर नियमित डॉक्‍टर उपलब्ध होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने एमबीबीएस पदवीधरांची प्राधान्याने नेमणूक करावयाची आहे. त्यानंतरही पदे रिक्त राहिल्यावर बीएएमएस पदवीधारकांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करावयाची आहे. त्यांना आदिवासी व दुर्गम भागासाठी दरमहा ४५ हजार, तर बिगर आदिवासी भागासाठी ४० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. ही नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करावयाची आहे. 

दरम्यान, नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने एमबीबीएस पदवीधारकांची नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने २ मार्च २०१५ ला घेतला होता, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याचे धोरण सरकारने ३ डिसेंबर २०१८ ला स्वीकारले. तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याने बीएएमएस पदवीधरांची नेमणूक करण्याचे ठरविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com