पाकिस्तानला केळी निर्यात नाही

Banana
Banana

रावेर - काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात पाठविणार नाही, असा निर्धार शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केला आहे. 

सुमारे चाळीस ते पन्नास ट्रक केळी जम्मू-काश्‍मीर मार्गावर ठिकठिकाणी उभी असून, ही केळी स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार आहेत. प्रसंगी ही केळी कवडीमोल दराने विकावी लागली, तरी चालेल किंवा भविष्यात अन्य देशांत निर्यातीच्या संधी शोधू; पण पाकिस्तानात केळी निर्यात करणार नाही, अशी संतप्त भावना जिल्ह्यातील केळी उत्पादक, व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.मागील आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात निर्यात होण्यास सुरवात झाली होती. सध्या हे प्रमाण आठवड्याला चाळीस ते पन्नास ट्रक इतके आहे, लवकरच दर आठवड्याला शंभर ट्रकची मागणी पाकिस्तानातून नोंदविली जाणार होती. मात्र, गुरूवारी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काल दुपारपासूनच जम्मू-श्रीनगर मार्गावरून पाकिस्तानला निर्यात होणारी केळीची वाहतूक ठप्प झाली आहे. अजूनही काही ट्रक सरहद्दीवर उभे आहेत. तर असंख्य ट्रक जिल्ह्यातून काश्‍मीरमध्ये जाण्यासाठी निघाले असून, ठिकठिकाणी रस्त्यावर पुढील आदेशाच्या प्रतीक्षेत थांबले आहेत.

ओडिशा आणि प. बंगाल या दोन राज्यांमध्ये दर्जेदार केळीची मोठी मागणी यापूर्वीही होती आणि आताही आहे. पाकिस्तानला निर्यात बंद झाली तरी अरब देशांतील निर्यातीत वाढ होऊ शकेल .
- के. बी. पाटील, केळी तज्ज्ञ, जैन इरिगेशन, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com