ग्रामीण भागातील पहिली  सॅनिटरी पॅड बॅंक स्थापन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

ग्रामीण भागातील पहिली 
सॅनिटरी पॅड बॅंक स्थापन 

जळगाव : रक्षाबंधनाचा सण नुकताच उत्साहात पार पडला. "मी जन्मभर माझ्या ताईचे रक्षण करेल', असा संकल्प करणारा हा दिवस धरणगाव तालुक्‍यातील कल्याणेहोळ या गावाने आदर्श पद्धतीने साजरा केला. गावातील व पंचक्रोशीतील आपल्या भगिनींच्या आरोग्यासाठी गावातील सर्व तरुणांनी महाराष्ट्रातील पहिली ग्रामीण सॅनिटरी पॅड बॅंकेची स्थापना करून जिल्ह्यात नवा आदर्श घालून दिला. कल्याणेहोळ ग्रामपंचायत, नोबेल फाउंडेशन व सावली फाउंडेशनच्या पुढाकाराने या बॅंकेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. 

कल्याणेहोळ देशातील पहिले "विज्ञानगाव' म्हणून परिचित आहे. येथे महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी महिला आरोग्य विज्ञान केंद्र कार्यरत आहे. या अंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिरे, समुपदेशन असे उपक्रम राबविले जातात. सॅनिटरी पॅड बॅंक स्थापनेसाठी सरपंच रमेश राजाराम पाटील, उपसरपंच आजेंद्र पाटील व ग्रामपंचायत सदस्य तथा नोबेल फाउंडेशनचे संचालक विशाल पाटील यांनी पुढाकार घेतला. यात पहिल्या टप्प्यात तीनशे महिलांना लाभ मिळाला. प्रसंगी जयदीप पाटील यांनी महिला व युवतींना सॅनिटरी पॅडचा संच भेट म्हणून दिला. कार्यक्रमास माध्यमिक शिक्षक समाधान पाटील, सावली फाउंडेशनचे कार्यकर्ते व तरुण उपस्थित होते. 
.... 

आदिवासी महिलांसाठी... 
आदिवासी, भिल्ल महिला तसेच आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या महिला आर्थिक अडचणीमुळे सॅनिटरी पॅड खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक आजारांना महिलांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रक्षाबंधनानिमित्त गावात सॅनिटरी पॅड बॅंक स्थापन करण्यात आली. या बॅंकेतर्फे आदिवासी व आर्थिक दुर्बल महिलांना दर महिन्याला मोफत पॅड पुरविले जातील. 

Web Title: bank