राजापूरची महाराष्ट्र बँक म्हणते आता दुसरा धनादेश आणा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

येवला : तुम्ही शेतकऱ्यांना दिलेल्या धनादेशाचे कुरियर हरवले असल्याने संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किवा इतर मार्गाने पैसे अदा करावे असे पत्र राजापूरच्या महाराष्ट्र बँकेने धनादेश देणाऱ्या व्यापाऱ्यांना दिले आहे. यामुळे धनादेश हरवले बँकेने पण दुसरा धनादेश मिळविण्यासह पैशांसाठी शेतकऱ्यांवर भटकंतीची आणि मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. यामुळे बँकेच्या राजापूर शाखेविषयी संताप व्यक्त होत आहे.

राजापूर येथे महाराष्ट्र बँकेची शाखा असून परिसरातील राष्ट्रीयकृत असलेली एकमेव बँक या परिसरात असल्याने पाच ते सहा गावांतील शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार येथून चालतात. शेतमाल विक्रीसह इतर खाजगी व्यवहारांचे धनादेश देखील शेतकरी व इतर ग्रामस्थ येथेच वटणावळीसाठी जमा करतात. नेहमीप्रमाणे येथे जमा झालेले शेतकऱ्याचे सुमारे १७ लाखाच्या रकमेचे ४२ धनादेश राजापूर शाखेचे व्यवस्थापक देशमुख यांनी येवला येथील सोमाणी कुरीयरकडे ९ एप्रिलला कुरियर करण्यासाठी दिले. हे टपाल येवल्यातून नाशिक येथील सोमाणी कुरीयरकडे पाठवले गेले होते. मात्र,सोमाणी कुरीयरने यांनी हे टपाल टिळकरोड येथील सर्व सेवा शाखा बँकेत देण्याएवजी गडकरी चौक येथील बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य कार्यालयात जमा केल्याचे तपासात उघड झाले आहे.

या बेचाळीस शेतकऱ्यांना ज्यांनी चेक दिले त्यांना उद्देशून दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण दिलेला धनादेश आपल्या बँक खात्यातून वटणावळ झाला की नाही ते पाहावे.नाहीतर संबंधितांना नावाने धनादेश द्यावा किंवा रोख व इतर मार्गाने पैसे देण्यात यावे अशी विनंती बँकेने या पत्राद्वारे केली आहे.वास्तविक या सगळ्या प्रकारात कुठलाही दोष नसताना धनादेश बँकेत जमा केलेले शेतकरी मात्र मनस्ताप सहन करत असून आता दुसरा धनादेश किंवा पैसे मिळविण्यासाठी त्यांना वारंवार चकरा मारावा लागणार आहे.एवढे सगळे करूनही पैसे मिळण्यास अडचणी आल्या तर शेतकरी बँकेसमोरच आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: bank of maharashtrav from rajapur says submit another cheque