बॅंकांना आज अवघे 65 कोटी मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नाशिक - शहरातील नोटाटंचाईच्या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने स्टेट बॅंकेला 65 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली. उद्या (ता. 18) कल्याण (चेस)मधून नाशिकला 65 कोटी मिळतील. 

नाशिक - शहरातील नोटाटंचाईच्या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने स्टेट बॅंकेला 65 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली. उद्या (ता. 18) कल्याण (चेस)मधून नाशिकला 65 कोटी मिळतील. 

शहरातील एटीएममध्ये खडखडाट कायम आहे. सोबतच बहुतांश भागातून दोन हजाराच्या नोटा गायब झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नोटांची कृत्रिम टंचाईचे चित्र आहे. दोन हजाराच्या नोटा आश्‍चर्यकारकरीत्या गायब झाल्या असून, अन्य मोठ्या मूल्यांकनाच्या नोटा मिळत नाही. एटीएममधून लहान लहान नोटाचे दर्शन नाही. अशा कृत्रिम टंचाईच्या स्थितीमुळे सामान्य नागरिक मात्र हैराण आहे. त्यामुळे जो काळा पैसा शोधून काढण्यासाठी नोटाबंदीचे हत्यार वापरले गेले त्यासाठी दोन हजाराच्या नोटा गायब होण्यामागे हेच कारण आहे काय, अशी चर्चा सुरू आहे. 

वीस टक्के रोकड जमा 
बॅंकांकडून साधारण शंभर रुपये ग्राहकांना वितरित झाल्यानंतर त्यापैकी सरासरी 60 रुपये ग्राहकांकडून विविध कारणाने बॅंकांमध्ये जमा होतात. हा जमा व नावे खात्यातील रोख रकमांच्या जमा व वितरणातील प्रमाणावर काही दिवसांपासून परिणाम जाणवत आहे. मोठ्या व्यवहारांसाठी नोटांचा वापर होतोच, सोबतच कॅशलेस व्यवहारांतील विविध करांचे लचांड टाळण्यासाठी बॅंकेतून काढलेल्या नोटा बाहेरच्या बाहेर चलनात फिरत असल्याने बॅंकांतून काढलेल्या पण पुन्हा बॅंकेत जमा होणाऱ्या नोटांचे प्रमाण 60 टक्‍क्‍यांहून 20 टक्‍क्‍यांपर्यंत घटले आहे. 

शहराला 40 कोटी 
राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे 36 कोटी रुपये शिल्लक आहेत. विविध खासगी बॅंकांकडे 70 कोटींच्या आसपास रोकड आहे. स्टेट बॅंकेला उद्या 65 कोटी मिळणार असून, त्यातील 40 कोटी शहरातील बॅंकांसाठी, तर 25 कोटी ग्रामीण भागातील बॅंकांसाठी दिले जाणार आहेत. निदान मोजके व गर्दीच्या ठिकाणच्या एटीएममध्ये उद्यापासून रोख रकमा काढता येऊ शकेल, असा अंदाज आहे. 

Web Title: Banks today have only 65 million