‘बऱ्हाणपुरी मुजरा’ कोल्हेंच्याच फार्म हाउसवर!

जळगाव - ममुराबाद रस्त्यापासून दीड किलोमीटरवरील हेच ते फार्म हाउस.
जळगाव - ममुराबाद रस्त्यापासून दीड किलोमीटरवरील हेच ते फार्म हाउस.

जळगाव - ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाउसवर सोमवारी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री उपअधीक्षकांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यातील ‘बऱ्हाणपुरी मुजरा’ कारवाईत संबंधित फार्म हाउस नेमके कुणाचे, हे मंगळवारपर्यंत समजू शकले नव्हते. अखेर बुधवारी हे फार्म हाउस माजी महापौर तथा नगरसेवक ललित कोल्हे यांच्याच मालकीचे असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. 

जळगाव- ममुराबाद रस्त्यावर सोमवारी (ता. ३१) ‘बऱ्हाणपुरी मुजरा’ सुरू असल्याच्या माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने छापा टाकला. कुठलीही परवानगी न घेता चाललेल्या या पार्टीवर छापा टाकण्यापूर्वीच काही बड्या धेंड्यांनी शेतातून पळ काढला. हे फार्म हाउस कोल्हेंच्या मालकीचे असल्याचे समोर आले असले तरी स्वत: ललित कोल्हे यांनी मात्र ते भाड्याने चालवायला दिल्याचे स्पष्ट केले आहे. 

...यांनी भरला हजार रुपये दंड
दिलीप शालिग्राम पाटील (वय ५४, रा. पाळधी), तरुण रंगलानी (वय ३९, साने गुरुजी कॉलनी), भारत राजकुमार तलरेजा (वय ३२, सिंधी कॉलनी), मुन्ना वाहऱ्या बारेला (वय ३५, ममुराबाद), नितीन अशोक वाणी (वय ३२, मोहननगर), लाला वाहऱ्या बारेला (वय २३, ममुराबाद), सरफराज मिनाज शेख (वय २०, मास्टर कॉलनी), विशाल ओमप्रकाश वर्मा (वय ३८, बी. जे.मार्केट), प्रवीण सोनमलजी जैन (वय ३७, बळीरामपेठ), राजेश गोविंद माहेश्‍वरी (वय ३७, एमआयडीसी), कमलाकर तुकाराम बनसोडे (वय ४०, रथ चौक), चंद्रकांत राजाराम खडके (वय ५२, विठ्ठलपेठ), प्रशांत विश्‍वनाथ अग्रवाल (वय ३७, सराफ बाजार), दिलीप दीपक रंगलानी (वय ३१, सानेगुरुजी कॉलनी), कलीम खा अलीम खान (वय २८, बऱ्हाणपूर), गिरीश प्रकाश राहोटी (वय ३८, सिंधी कॉलनी), सय्यद जावेद सय्यद मतीन (वय २६, रा. बऱ्हाणपूर) यांच्यासह शबनम बिजली कव्वाल (५०, प्रतापपुरा बऱ्हाणपूर), जुलेखाबानो नुरीसाबी कव्वाल (वय ४५), हीना शेख सईद शेख (वय २५), शादान मोहम्मद जमाल (वय २६), नदिमाबानो मोहम्मद जमाल (वय २०), राणी शादाब परवेझ (वय २४).

पोलिसांची सूचना ऐकली!
पोलिसांनी सर्व संशयितांना आवश्‍यक कागदपत्रांसह न्यायालयात आणले होते. न्या. डी. बी. साठे यांच्यासमोर उभे केले असता त्यांनी प्रत्येकाला नाव विचारले, गुन्हा कबूल आहे का? असाही प्रश्‍न केला. प्रत्येकी हजार असे २४ जणांचा २४ हजार रुपये दंड करण्यात आला. अर्थात, न्यायाधीशांपुढे हजर होण्यापूर्वीच ‘गुन्हा कबूल आहे.. असेच म्हणायचे बरं’ अशी तंबी पोलिसांकडून दिली गेली होती. त्याआधारे सर्वांनी ‘गुन्हा कबूल’ असल्याचा पाढा तेवढा वाचल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com