नववीचे 75 हजार विद्यार्थी देणार पायाभूत चाचणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

नाशिक : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत उद्या (ता. 30) शहर आणि जिल्ह्यातील 700 माध्यमिक शाळांमध्ये पायाभूत चाचणी होईल. ही चाचणी 75 हजार विद्यार्थी देत आहेत. त्यासाठी मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी आज येथे दिली.

नववीमधील अनुत्तीर्णांचे प्रमाण शून्य करण्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानांतर्गत सरकारी शाळांसाठी ही चाचणी घेण्यात येत आहे. मराठी, गणित, इंग्रजी विषयांच्या चाचणीसाठी 90 सरकारी शाळांसाठी प्रश्‍नपत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. हा उपक्रम खासगी माध्यमिक शाळांमध्ये राबविण्याची संकल्पना मांडण्यात आल्यावर त्यास मुख्याध्यापकांसह शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

मराठी माध्यमांसह सेमी इंग्रजी आणि ऊर्दू माध्यमाच्या प्रश्‍नपत्रिका तयार करून घेण्यात आल्या आहेत. या चाचणी परीक्षेत 18 पेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. अशा विद्यार्थ्यांना डिसेंबर ते मार्च 2017 पर्यंत जलदगतीने अध्यापन केले जाईल.
....

Web Title: basic test of school children