"बी.फार्म'साठी पाच पट अर्ज, "बी.ई.'च्या जागा राहणार रिक्‍त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नाशिक - गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम बी.ई.च्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्‍त राहात आहेत. यंदाही नाशिक विभागात उपलब्ध जागांच्या तुलनेत ऑनलाइन अर्ज कमी आलेले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तरी जागा रिक्‍त राहतील अशी स्थिती असून, प्रवेश मिळविण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांची दमछाक होणार आहे. दुसरीकडे औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम "बी.फार्म.'साठी उपलब्ध जागांच्या तुलनेत पाच पटीने अर्ज दाखल झालेले आहेत. 

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी नाशिक विभागात दाखल अर्जांपैकी सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असे गृहित धरले तरीदेखील सुमारे दीड हजार जागा रिक्‍त राहणार असल्याची स्थिती आहे. 

दरम्यान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला गतवर्षीप्रमाणेही यावर्षी विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे. पदवी अभ्यासक्रम बी.फार्मसीच्या एका जागेसाठी पाच अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामुळे यावर्षी फार्मसीच्या सर्व जागा भरल्या जाण्याची स्थिती आहे. विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेता, महाविद्यालयांचा जागा वाढविण्यावर भर दिला जातो आहे. 

प्रवेशासाठी गुणवत्ता वाढणार 
बी.फार्मसाठी पाच पट अर्ज दाखल झाल्याने साहजिकच प्रवेशासाठी चुरस बघायला मिळेल. पर्यायाने कट-ऑफची गुणवत्ता वाढणार आहे. बुधवार (ता.27) पर्यंत पहिल्या कॅप राउंडसाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. यानंतर गुरुवारी (ता.28) निवड यादी जाहीर होणार असल्याने, या वेळी किती टक्‍क्‍यांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्‍यता आहे, याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकेल. 

नाशिक विभागातील अशी आहे स्थिती- 
अभ्यासक्रम उपलब्ध जागा ऑनलाइन दाखल अर्ज 
बी.फार्म. 3310 15787 
बी.ई. 18520 17,065 

Web Title: BE vacancy will remain