जायला जागा दिली नाही म्हणून मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

केवळआम्हाला जायला साईड का दिली नाही म्हणून मारहाण केली. यावेळी बसमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते. त्यांनी तातडीने मध्यस्थी करून बसचालकास घोटी पोलीस ठाण्यात आणले. घटनेची माहिती मिळताच कर्मचारी यांनी याच्या निषेधार्थ एक तास एसटी वाहतूक बंद केली.

नाशिक : त्र्यंबकेश्वर मार्गे इगतपुरी डेपोकडे रवाना होणारी बस क्रमांक ( एमएच ४० एन. ८८२६ ) मुंबई-नाशिक महामार्गाने जात असताना सकाळी दहा वाजता घोटी येथील हॉटेल किनारासमोर अज्ञात पाच इसमांनी बसचालक दिलीप शिवराम पवार ( वय ३८ ) यास मुंबईकडे जात असणारी इनोव्हा क्रमांक ( एमएच सीएम. ९३९९ ) मधील इसमांनी केवळआम्हाला जायला साईड का दिली नाही म्हणून मारहाण केली. यावेळी बसमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते. त्यांनी तातडीने मध्यस्थी करून बसचालकास घोटी पोलीस ठाण्यात आणले. घटनेची माहिती मिळताच कर्मचारी यांनी याच्या निषेधार्थ एक तास एसटी वाहतूक बंद केली.  यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी तातडीने प्रवाशी वाहतुकीची अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत तातडीने आगार प्रमुख संदीप पाटील यांना बोलावत तिढा सोडवला. 

घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अज्ञात पाच व्यक्ती विरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तातडीने आरोपींना पकडण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले.  त्यानंतर बंद मागे घेण्यात आले. अज्ञात हे नाशिक येथील राहणारे असून मनसेचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे येत आहे. मारहाणीनंतर तातडीने संबंधित इसम फरार झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beat the bus driver at mumbai-nashik highway