सातवर्षीय मुलाला दिले चटके

Aaditya-Chavan
Aaditya-Chavan

जळगाव - कांचननगरात मावशी- मावसाकडे वास्तव्यास असलेल्या सातवर्षीय मुलावर गेले काही दिवस अत्याचार होत असल्याचे आढळून आले. रोजच मुलास मारहाण होत असल्याने शेजारील महिलांना असह्य झाल्याने त्यांनी चौकशी केली. पीडित मुलाच्या अंगाला सराट्याने चटके लावून, तसेच तळपायाचे सांडशीने बुथडे तोडल्याने जखमा झाल्याचे आढळले. मुलासह पती-पत्नीला शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सुनील भागीरथी व माया भागीरथी हे दाम्पत्य दोन महिन्यांपूर्वी सातवर्षीय मुलाला घेऊन कांचननगरात भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी आले आहेत. शेजाऱ्यांना सकाळ- सायंकाळ लहानग्या मुलाला मारहाण होत असल्याने तो रडत असल्याचा आवाज येत होता. रोजच कशी मारहाण होते, अशी शंका शेजाऱ्यांना होती. शुक्रवारी (१९ ऑक्‍टोबर) रात्री सुनील व माया दोघेही आदित्य नीलेश चव्हाण (वय ७) याला मारहाण करीत असताना शेजारी राहणाऱ्या महिलांना असह्य झाले. त्यांनी मध्यस्थीसाठी त्यांच्या घरात डोकावून पाहिले. भेदरलेल्या अवस्थेत लहानसा जीव वाचवण्यासाठी कोपऱ्यात कुठेतरी हात-पाय दुमडून किंचाळत होता व दोघेही त्यावर तुटून पडलेले होते. महिलांना शंका आली, की हे दोघे त्याचे आई-वडील होऊच शकत नाहीत किंवा दूरच्या नात्यातला कुणीही अशा क्रूर पद्धतीने मारहाण करणारच नाही. दिवस उजाडल्यावर परत तोच पाढा.

महिलांनी खोचला पदर
रोज सकाळ- सायंकाळचा प्रकार आणि डोळ्यांदेखत मुलावर अमानुष अत्याचार होत असल्याचे बघितलेल्या महिलांनी दोघी- तिघींना सोबत घेत थेट घरात शिरकाव करून या मुलाला उचलत थेट पोलिस ठाणे गाठले. माया-सुनील दोघांनाही पोलिस ठाण्यात आणण्यात आले. उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, सलीम पिंजारी यांनी तत्काळ मुलास वैद्यकीय उपचारास रवाना करून त्याला जेवण, बिस्किटे दिल्यावर आस्थेवाइक चौकशी केली.

मावशावर गुन्हा दाखल
आदित्यशी बोलणे केल्यावर तो, घाबरतच एकेक शब्द काढत होता. आई-वडील औरंगाबादला. दिवाळीत येतील, कशाने मारले, तर तेही सांगताना त्याला बोलणे कठीण झाले होते. घरातून पळून जाऊ नये म्हणून सांडशीने बुथडे तोडल्याने संपूर्ण तळपाय जखमी झाला होता, तर पाठीवर चटके देण्यात आले होते. प्राथमिक चौकशीअंती मारहाण करणारा कथित मावसा सुनील भागीरथी हा ट्रकचालक असून, त्याने मायासोबत प्रेमविवाह केला आहे. पीडित मुलाच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना बोलावण्यात येणार असून, सुनील भागीरथी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com