एसटी कामगार सेनेचे पाटील, शिंदे यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

जळगाव - शिवसेना उपजिल्हाप्रमुख चिंतामण जैतकर यांनी जळगाव विभागातील अनागोंदी कारभाराबाबत लिहिलेले पत्र एसटी विभाग नियंत्रकांना का दिले? या कारणावरून कामगार सेनेचे कार्याध्यक्ष आर. के. पाटील (जळगाव विभाग), कामगार सेनेचे सचिव आर. आर. शिंदे (जळगाव आगार) यांना मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

काल (ता. ५) मोहाडी येथील एका चालकाकडील लग्न आटोपून सायंकाळी साडेचारच्या सुमारास जळगावकडे परतत असताना खुबचंद साहित्या जवळील मंदिरा जवळ मनोज प्रकाश सोनवणे उर्फ मण्या, कैलास सोनवणे (रा. जैनाबाद, जळगाव), विनोद शितोळे (एसटी क्वार्टर), अन्य एक अशा चौघांनी दुचाकी रोखून हल्ला चढविला. मद्यधुंद अवस्थेतील या चौघांनी शिवीगाळ करत पाटील व शिंदे यांना काठ्यांनी मारहाण केली व घटनास्थळावरून पसार झालेत. कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन जखमी पाटील, शिंदे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी रुग्णालय परिसरात एसटी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.

याबाबत रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस तक्रार देण्यात आली आहे. एका संशयिताने मद्यधुंद अवस्थेत गोपाळ पाटील (संयोजक, संयुक्त कृती समिती) यांना धमकी दिल्याने ती देखील तक्रार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात देण्यात आलेली आहे.

उपजिल्हाधिकारी चौकशी करणार
या प्रकरणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करून विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांच्या अनागोंदी कारभाराची देखील चौकशी करण्याची मागणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकरणाची चौकशी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: beating in jalgav