मातीमोल बाजार भावामुळे कोथिंबीरच्या दिड एकर क्षेत्रात सोडली गुरे

खंडू मोरे
बुधवार, 6 जून 2018

खामखेडा (नाशिक) - कोथांबीरचे भाव गडगडल्याने येथील शेतकरी देविदास विट्ठल शेवाळे यांनी आपल्या दीड एकर कोथांबिरीत गुरे सोडली. तीन चार दिवसापूर्वी अर्ध्या एकरातील कोथांबीर बाजारात नेल्यावर २० किलोच्या कट्ट्यास ९० रुपये बाजार भाव मिळाल्याने राहिलेल्या इतर क्षेत्रातून खर्च देखील निघणार नसल्याने संतापात त्यांनी असे केले.

खामखेडा (नाशिक) - कोथांबीरचे भाव गडगडल्याने येथील शेतकरी देविदास विट्ठल शेवाळे यांनी आपल्या दीड एकर कोथांबिरीत गुरे सोडली. तीन चार दिवसापूर्वी अर्ध्या एकरातील कोथांबीर बाजारात नेल्यावर २० किलोच्या कट्ट्यास ९० रुपये बाजार भाव मिळाल्याने राहिलेल्या इतर क्षेत्रातून खर्च देखील निघणार नसल्याने संतापात त्यांनी असे केले.

कोबी, टोमटो, टरबूज, वांगी, भाजीपाला व आता कोथबीर ही ऐन उन्हाळ्यात घेतलेले सर्वच पिक यावर्षी मातीमोल दराने विकला जात असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, उत्पन्न खर्चही निघत नसल्यामुळे शेवाळे वेतागले आहेत. अर्ध्या एकरातील कोथंबीर बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे व काढणी मजुरी देखील खिशातून भरण्याची वेळ कोथंबीर उत्पादक शेतकऱ्यावर आली असून, उन्हातान्हात काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी नेल्यावर २० किलो गड्ड्यास ८० ते नव्वद रुपये बाजार मिळाल्याने कोथंबीर नेलेल्या वाहनाचे भाडे देखील आपल्यालाच खिशातून भरावे लागत आहे. त्यामुळे राहिलेल्या पिकातून उत्पादन खर्च देखील सुटणार नसल्याने दीड एकर कोथंबीरीच्या उभ्या पिकात जनावर सोडण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली.

कोथंबीर पिकासाठी एकरी पंचवीस हजार रुपये खर्च करून हातात एक रुपया पण पडत नसून, उलट घरातून पैसे घालण्याची वेळ उत्पादक शेतकरी वर्गावर आलेली आहे. मार्केटमध्ये नेऊन खिश्यातून पैसे देण्यापेक्षा खामखेडा येथील शेतकर्याने कोथंबीरीच्या उभ्या पिकात गुरे सोडली.

सध्या गिरणा नदीच्या काटावरील खामखेडा, भादवन तशेच कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोथंबीर लागवड होत असते. मात्र सध्या आवक कमी असून, देखील बाजार भाव चांगला मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

कोथंबीर पिक माल शेतात तयार झाल्यावर व्यापारी वर्ग थेट शेतकऱ्याचा शेतात येत असतो. मात्र सध्या शेतकरी आंदोलना मुळे व्यापारी कोथंबीर भाहेरच्या मार्केटला नेत नाहीत. व बाजारात देखील पुरवठा नसतांना मातीमोल दराने कोथंबीर विकली जात असल्याने उत्पादनासाठी लागलेला खर्च व उत्पादनानंतर येणारा खर्च ताळा केला तर आजच्या भावात उत्पादक शेतकऱ्यास पीक परवडत नाही.

गेल्या दोन महिन्यात दोन टप्यात लागवड केली. पहिल्या टप्प्यातनाही तर दुसऱ्या प्लॉटला चांगला दर मिळेल या आशेवर लागवड केली. मात्र कवडीमोल दरामुळे खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे हजारो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या पिकात कालपासून गुरे सोडले आहेत.”
देविदास शेवाळे, शेतकरी खामखेडा

Web Title: because for market rate farmers cut coriander farm