अधिकारी होण्यासाठी कठोर परिश्रम करा - डॉ. मयूर पाटील

भगवान जगदाळे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून केवळ मार्गदर्शनाअभावी ते स्पर्धा परीक्षेत मागे पडतात. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी जिद्द व चिकाटीने कठोर परिश्रम घेतल्यास यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी केले. येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात 'विद्यार्थी विकास मंच'तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष व 'विद्यार्थी विकास मंच'चे संस्थापक ऍड. शरदचंद्र शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

निजामपूर-जैताणे (धुळे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून केवळ मार्गदर्शनाअभावी ते स्पर्धा परीक्षेत मागे पडतात. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी जिद्द व चिकाटीने कठोर परिश्रम घेतल्यास यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी केले. येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात 'विद्यार्थी विकास मंच'तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष व 'विद्यार्थी विकास मंच'चे संस्थापक ऍड. शरदचंद्र शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

व्यासपीठावर जैताणेचे सरपंच संजय खैरनार, संस्थेचे अध्यक्ष दशरथ पाटील, शालेय समिती अध्यक्ष अजितचंद्र शाह, खजिनदार दत्तात्रय वाणी, सचिव नितीन शाह, संचालक बारीक पगारे, राजेंद्र वाणी, राजेंद्र येवले, राघो पगारे, प्राचार्य डॉ. अशोक खैरनार, मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पावबा बच्छाव, डॉ. पाटील यांचे सहकारी चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ऍड. शरदचंद्र शाह, डॉ. मयूर पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फीत कापून, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले. ईशस्तवन व स्वागतपद्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयाच्या सुमारे 150 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ऍड. शरदचंद्र शाह यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्यासोबतच एक चांगला नागरिक होणेही खूप गरजेचे आहे. ऍड. शरदचंद्र शाह यांनी आपल्या 75व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला विद्यार्थी विकास मंचसाठी जाहीर केलेल्या 75 हजार रुपये देणगीपैकी उर्वरित 25 हजार रुपये रकमेचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी सरपंच संजय खैरनार, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, शिक्षक शरद जगताप, दिलीप पाटकर, शोभा उपाध्ये, भगवान जगदाळे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनींनी डॉ. मयूर पाटील यांना विविध प्रश्न विचारले. डॉ. पाटील यांनीही सर्वांच्या शंकांचे निरसन केले. प्राचार्य डॉ. अशोक खैरनार, मुख्याध्यापक जयंत भामरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अजबराव इंगळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिक्षक सत्यनारायण शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. राजेश शाह यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 'विद्यार्थी विकास मंच'चे अध्यक्ष नितीन शाह, सचिव शरद जगताप, प्रा. रामचंद्र सोंजे, प्रा. विजय भामरे, प्रा. प्रणव गरुड, भिकाजी गावित, पंकज जाधव, धर्मदास पावरा, जयंतीलाल कासार, जगदीश पवार आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: to become collector give strong efforts said mayur patil