बडीदर्गा संरक्षक भिंतीच्या कामाला अखेर प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

जुने नाशिक - बडीदर्गा संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करून महिन्याचा कालावधी लोटला, तरी प्रत्यक्षात बांधकाम सुरू झाले नसल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची बांधकाम विभागाने दखल घेत संरक्षक भिंतीचे काम सुरू केले. यामुळे दर्गा विश्‍वस्त व भाविकांनी "सकाळ'चे आभार मानले. 

जुने नाशिक - बडीदर्गा संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करून महिन्याचा कालावधी लोटला, तरी प्रत्यक्षात बांधकाम सुरू झाले नसल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची बांधकाम विभागाने दखल घेत संरक्षक भिंतीचे काम सुरू केले. यामुळे दर्गा विश्‍वस्त व भाविकांनी "सकाळ'चे आभार मानले. 

बडीदर्गाच्या दोन्ही संरक्षक भिंती गेल्या वर्षी पावसामुळे कोसळल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने भिंतीचा पंचनामाही केला होता. आमदार देवयानी फरांदे यांनी भिंतीच्या कामासाठी आमदारनिधीतून दहा लाखांचा निधी मंजूर केला. आमदार फरांदे यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजनही झाले. दोन महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही. बांधकामाला विलंब होत असल्याच्या तक्रारी भाविकांसह नागरिकांनीही केल्या. आमदार फरांदे यांनी त्वरित बांधकाम सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. त्यानंतर लगेचच विभागाच्या ठेकेदारांनी कामाला प्रारंभ केला. सध्या कोसळलेल्या भागाची माती काढून सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. 

पावसाळा व वाढीव निधीची मंजुरी लक्षात घेता, पहिल्या टप्प्यात 15 मीटर भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे, अशी माहिती ठेकेदार आसाराम शेळके यांनी दिली. अन्य भिंतीचे काम पावसाळ्यानंतर होईल, असे त्यांनी सांगितले. 

भूमिपूजन एकाचे, बांधकाम दुसऱ्या भिंतीचे 
दर्ग्याच्या आतील भागातील संरक्षक भिंतीला लागूनच रहिवासी राहताहेत. त्यांच्या घरावरच ती भिंत कोसळली होती. पावसाळा लक्षात घेता त्या भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार फरांदे यांनी केले होते. प्रत्यक्षात मात्र दुसऱ्याच भिंतीचे काम होत असल्याने नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. दोन्ही भिंतींचे बांधकाम आवश्‍यक आहे; परंतु प्रथम आतील भिंतीचे काम व्हावे जेणेकरून रहिवाशांना भीती राहणार नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. 

Web Title: The beginning of the work to the bigger protector wall