काँग्रेसतर्फे ‘विश्‍वासघात दिन’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने चार वर्षे पूर्ण केली असून, या काळात ते सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे काँग्रेसतर्फे शनिवार(ता. २६)चा दिवस ‘विश्‍वासघात दिन’ पाळण्यात आला. 

पक्षाच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराविरोधात दुचाकीला हातगाडीवर, तर चारचाकीला ओढत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नेत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. काळे कपडे परिधान केलेले काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने चार वर्षे पूर्ण केली. या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत शहर जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. हेमलता पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. चार वर्षांपूर्वी मोदींनी लोकांना भरपूर स्वप्ने दाखवली. आश्वासने दिली. जनतेनेही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते दिली. सत्तेवर आल्यावर आश्वासने मोदी पूर्ण करतील, अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र, मोदींनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. 

‘हा विश्‍वासघात नाही का?’
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक नफा देऊ, असे पंतप्रधान म्हणाले होते. आज शेतमालाला हमीभावही मिळत नाही.

दुसरीकडे,आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किमती कमी होत असताना सरकारने २१ राज्यांत २५ टक्के व्हॅट पकडला तर १७ लाख कोटी रुपये पेट्रोल व डिझेलच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून काढून घेतले, हा ‘विश्‍वासघात’ नाही तर काय आहे? असा सवाल काँग्रेसने केला  आहे. याशिवाय कर्जमाफी द्यायला दोन लाख कोटी रुपये नाहीत म्हणता आणि उद्योगपतींचे लाख हजार कोटींचे कर्ज माफ करता, हा विश्‍वासघात नाही का? भाजपचे सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांमध्ये ४१.७ टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

Web Title: Betrayal day by congress