भडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला

सुधाकर पाटील 
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

भडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत पावलेला विद्यार्थी भडगाव येथील लाडकुबाई विद्यालयात दहावित शिक्षण घेत होता.  

भडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत पावलेला विद्यार्थी भडगाव येथील लाडकुबाई विद्यालयात दहावित शिक्षण घेत होता.  

काल गणेश विसर्जनाची धामधुम दिसुन आली. मात्र एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याने तालुक्यातील वलवाडी गावावर शोककळा पसरल्याचे पहायला मिळाली. याबाबत मिळालेली माहीती अशी की, काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वलवाडी  ( ता. भडगाव) येथे गणेश विसर्जनाची लगबग सुरू होती. प्रफुल्ल रमेश पाटील ( वय 15) , त्याचा लहान भाऊ व काही मित्रा समवेत पारोळा रस्त्यावर असलेल्या डोहाजवळ गणेश विसर्जनासाठी गेले होते.  विसर्जना दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व मुले पाण्यात बुडु लागले. ही घटना ग्रामस्थांना समजताच जवळच असलेले सध्या सुटीवर आलेले जवान निलेश पाटील व तरूण दिनेश पाटील  डोहाकडे धाव घेतली. चार विद्यार्थ्याना त्यांना वाचविण्यात यश आले. मात्र प्रफुल्ल पाटील हा खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रफुल्लला काढल्यानंतर त्याला उपचारासाठी भडगाव, पाचोरा येथे दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान ग्रामस्थांना घटनेची माहीती मिळताच डोहाकडे धाव घेतली. त्यांनी विद्यार्थाना बाहेर काढण्यासाठी मदत केली.  ही वार्ता गावात पसरताच शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबीयाचा आक्रोश मन हेलावणारा होता. प्रफुल्ल वर रात्रीच दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान प्रफुल्ल हा भडगाव येथील लाडकुबाई विद्यालयात दहावित शिक्षण घेत होता. त्याचे वडील शेतकरी तर आई पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा स्वयंमसेविका आहे.

Web Title: Bhadgaon - one dead in ganesh visarjan miravnuk