शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी जिल्हास्तरीय ‘भगवद्‌गीता पठण’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

जळगाव - अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान व केसीई सोसायटीच्या विविधता व संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी (८ जानेवरी) ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय श्रीमद्‌ भगवद्‌गीता पठण कार्यक्रम घेण्यात येईल, अशी माहिती अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी प्राचार्य अनिल राव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

शालेय विद्यार्थ्यांवर सुसंकार व्हावा, आध्यात्मिक ग्रंथाचा परिचय व्हावा, त्याची पठणक्षमता वाढावी यासाठी गेल्या बारा वर्षांपासून भगवद्‌गीता पठण कार्यक्रम आयोजित केला जातो. स्पर्धा चार गटांत होणार असून, प्रथम गट ः पहिली ते चौथी- अध्याय १३, श्‍लोक १ ते १८, द्वितीय गट - पाचवी ते सातवीचा असून, अध्याय १४, श्‍लोक १ ते १९, तृतीय गट - आठवी ते दहावीचा असून अध्याय १५, तर श्‍लोक १ ते २०, चौथा गट - सांघिक गट असून यात अध्याय १६ व श्‍लोक १ ते २० राहणार आहेत. 

स्पर्धेत शहरातील ११ व ग्रामीण भागातील तीन शाळांचा समावेश असून हजारो विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. यावेळी भगवदगीता स्पर्धा सुरु करण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे प्रा. बी. एम. भारंबे, प्रा. एम. डी. बोंडे व प्रा. व्ही. जे. चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व बेंडाळे प्रतिष्ठानच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संकल्पही करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेस मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे सेक्रेटरी शशिकांत वडोदकर, विविधता, संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापिका वैजयंती तळेले उपस्थित होत्या.

बैठक व्यवस्थेत बदल
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात रविवारी (८ जानेवारी) शहरी विभागातील विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०१७ (केंद्र क्र. १३१००१०२) ए. टी. झांबरे विद्यालयात होणाऱ्या परीक्षेची बैठक व्यवस्था विद्यालयाच्या बाजूलाच असलेल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात करण्यात आली आहे. तरी बैठक क्र. जे००४०१ ते एफ००७९० असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्याध्यापिका वैजयंती तळेले यांनी केले आहे.

Web Title: bhagwatgeeta teaching to school student