Bharat Bandh : तहसीलदारांना दिला मातीची चूल

Bharat Bandh : Mortise Soil given to Tahsildar
Bharat Bandh : Mortise Soil given to Tahsildar

नांदगाव : महागाई व इतर राष्ट्रीय मुद्द्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने पुकारलेल्या बंदमध्ये तहसीलदारांना मातीची चूल देऊन कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला. भारत बंद मधून नांदगाव वगळण्यात आल्याचे मानून शहरातील सर्व व्यवहार सकाळपासूनच सुरळीत होते. गृहिणींना भेडसावणाऱ्या इंधनाच्या समस्येकडे लक्ष वेधीत काँग्रेसच्या युवा नेत्या जिल्हा परिषदेच्या सदस्या अश्विनी आहेर यांनी आपल्या सोबत मातीची चूल आणली. गृहिणींना घर चालविणे कसे अवघड झाले याकडे तहसीलदार भारती सागरे यांना निवेदनासोबत मातीची चूल दिली. 

माजी आमदार अॅड अनिल आहेर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नांदगावच्या तहसीलदार भारती सागरे यांची भेट घेत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर आसूड ओढणारे निवेदन सादर केले. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले. 

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील, डॉक्टर प्रभाकर पवार निंबा मोरे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस श्रीमती मुनवर सुलताना, बाळासाहेब कवडे राष्ट्रवादीचे रमेश पगार, प्रकाश बोधक, सचिन मराठे, वाल्मिक जगताप, अनिल जाधव, उदय पाटील, सुकदेव मेंगाळ, चिंधा बागुल, हरेश्वर सुर्वे, अशोक गुप्ता, राजेंद्र लाठे, अॅड अमोल आहेर, चांगदेव भिलोरे, शेषराव घुगे, नारायण पवार, शब्बीर शेख, रामदास चव्हाण, दत्तू पवार, गोरख आहेर, नवनाथ बोरस, अयुब शेख, रामदास चव्हाण, अनील सरोदे, विठ्ठल नलावडे, विठोबा मवाळ, सुनील खरारे, नितीन सोर, डॉ. सागर भिलोरे, भगवान डांगे, अनिल खैरे, नाना गिरे, खातीब बबन शेख, दिलीप गरुड, सागर कांदळकर, दिलीप जाधव, रामभाऊ मंगा गिरे, आरिफ मन्सुरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com