Bharat Bandh : तहसील कार्यालयावर दुचाकी ढकलत मोर्चा 

Bharat Bandh : protester use Two-wheeler in Bandh
Bharat Bandh : protester use Two-wheeler in Bandh

येवला : तालुका काँग्रेस कमिटीसह मनसे व मित्रपक्षांच्या वतीने आज येथे तहसील कार्यालयावर दुचाकी ढकलत मोर्चा नेऊन पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या भडकलेल्या किमतींविरोधात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सर्वसामान्य जनता, शेतकरी पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे हैराण झाले आहेत. अशी परिस्थिती असताना राज्य व केंद्र सरकार कुठल्याही उपाय योजना करतांना दिसत नाही. जे मोठे आश्वासने सरकारने दिली त्यानुसार इंधनाची दरवाढ नियंत्रणात आणणे गरजेचे आहे मात्र दिवसेंदिवस दरवाढ होताच आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करावी. तसेच नोटाबंदी भ्रष्टाचार, राफेल घोटाळा, इव्हीएम मशीन घोटाळा यांची चौकशी करण्यात यावी. या मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे मोटरसायकल ढकलत मोर्चा काढण्यात आला. 

मनसेचे कार्यकर्तेही यात सहभागी होते. 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, तालुकाध्यक्ष अॅड. समीर देशमुख, शहर सरचिटणीस नानासाहेब शिंदे, एकनाथ गायकवाड, उस्मान शेख, संदीप मोरे, दत्तात्रय चव्हाण, अण्णासाहेब पवार, राजेंद्र गणोरे, बळीराम शिंदे, अण्णासाहेब पवार, मंगल परदेशी, अर्चना शिंदे, शिवाजी धनगे, महादू सोळसे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, मनसेचे जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे, शहराध्यक्ष गौरव कांबळे, तालुकाध्यक्ष नकुल घागरे, शैलेश कर्पे, महेश लासुरे, राहुल जाधव, सागर खोडके, विद्यार्थी शहराध्यक्ष महेंद्र जाधव, गणेश चव्हाण, सागर पवार, लखन पाटोळे, गोकुळ पाटील, आबासाहेब शिंदे, मुकेश पाटोदकर, सोमनाथ केदारे, सूर्यकांत गोसावी, रणजित संसारे, विनायक वाहुळ, विमल आहेर, किरण शिंदे, भगवान चिते, संजय पगारे, उत्तम चव्हाण, नारायण चव्हाण, बलराम हंडी, बाबुभाई शेख, रंगनाथ गिरी आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार रोहिदास वळवी याना निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com