खेडगाव जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत भास्कर भगरे विजयी

bhaskar bhagre.jpg
bhaskar bhagre.jpg

नाशिक : खेडगाव जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत भास्कर भगरे विजयी झाले आहेत. धनराज महाले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खेडगाव गटाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 12) झालेल्या मतदानाची टक्केवारी घसरली. यावेळी अपक्ष भास्कर भगरे आणि विजय वाघ या दोघांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. आज (ता.13) मतमोजणी झाली. यात भास्कर भगरे विजयी झाले आहेत.

भास्कर भगरे 11041 मतांनी विजयी 
भास्कर भगरे 11041 मतांनी विजयी झाले असून विजय वाघ यांना 4146 मते मिळाली. तर नोटा 134  अशा पध्दतीने भास्कर भगरे 6895  मतांच्या फरकांनी विजयी झाले. गुरुवारी (ता.१२) सायंकाळी साडेपाचपर्यंत 35 हजार 351 पैकी फक्त 15 हजार 321 मतदारांनी मतदान केले. एकूण 43.34 टक्के मतदान झाले. खेडगावमध्ये 45.17 टक्के मतदान झाले. विधानसभा निवडणुकीत 65 टक्‍क्‍यांच्या पुढे असलेली मतदानाची टक्केवारी पोटनिवडणुकीत घसरली. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली. मात्र, मतदारांमध्ये गुरुवारी निरुत्साह होता. ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे बोलतही नव्हते आणि त्याचा परिणाम मतदानात दिसून आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com